धुळे टुडे २ साठी मेन...
---
फोटो-NSK26H22510
धुळे : महापालिका महिला बालकल्याण समिती सभेला उपस्थित सभापती उज्वला ठाकरे, उपसभापती शोभा भिल, सहायक आयुक्त सोनाली देवरे, नगरसचिव मनोज वाघ व सदस्य.
---
महिला बालकल्याणकडून ९१ लाखांची कामे निश्चित
---
पहिली सभा; महिलांसाठी स्वच्छतागृह, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २५ : शहरात आवश्यक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी व दुरुस्ती करणे, मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी- काठी व ज्युडो प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे यासह इतर काही कामे महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीने गुरुवारी (ता.२५) निश्चित केले. या कामांसाठी ९१ लाख रुपये खर्चाची तरतुद करण्यात आली.
महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची पहिलीच सभा सकाळी अकराला महापालिकेतील स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात झाली. सभापती उज्वला ठाकरे, उपसभापती शोभा भिल, सहायक आयुक्त सोनाली देवरे, समिती सदस्य मिनल परदेशी, वैभवी दुसाने, प्रियंका बोरसे, प्रतिभा पाटील, संध्या कदम, शेख परवीनबानो रफीक, मंगला सोनवणे, हसिनाबानो साजिल अली अन्सारी, अन्सारी अमेराबानो सउदुल हसन आदी उपस्थित होते. शासन निर्णयानुसार महिला व बालकल्याण समितीने राबवायच्या योजना, निश्चितीकरण व मार्गदर्शन सुचनांबाबत माहिती देणे आणि सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील निश्चित केलेल्या अर्थसंकल्पास व त्यानुसार कार्यक्रम निश्चितीबाबत विचार करणे असे दोन विषय सभेपुढे होते.
९१ लाखांची कामे निश्चित
महिला व बालकल्याण समितीचा राखीव पाच टक्के प्रशासकीय बजेट ८८ लाख ६१ हजार रुपये तर महासभेत मंजूर बजेटनुसार तो एकूण दोन कोटी ७८ लाख २८ हजार रुपये आहे. या अंदाजपत्रकानुसार समितीने ९१ लाख रुपयांतून काही कामे निश्चित केली. सभेत सदस्या अमिराबानो अन्सारी यांनी प्रभाग-४ मधील लाला सरदार नगर येथील शौचालय दुरुस्ती तसेच प्रभागात बोअरवेल्सची तसेच गरजू विद्यार्थीनींना सायकल वाटपची मागणी केली. सदस्या आमेरा अन्सारी यांनी सभापतींना निवेदन देत प्रभाग- १७ मधील फायनल प्लॉट ८१ च्या खुल्या जागेत अल्पसंख्यांक महिलांसाठी सभागृह बांधण्याची मागणी केली.
---
महिला बालकल्याण समितीकडून निश्चित केलेली कामे
- महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणी व दुरुस्ती.....३५ लाख
- अंगणवाडी व शाळा दुरुस्ती......................दहा लाख
- मुलींसाठी लाठी-काठी व जूडो कराटे प्रशिक्षण..... सहा लाख
- महिलांसाठी विणकाम, शिवणकाम, ब्युटी पार्लर कोर्स.....चार लाख
- महिला सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे.......२० लाख
- किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण व आरोग्यविषयक जनजागृती, पिंक हेल्थ कार्यक्रम घेणे- दोन लाख
- महिला स्वच्छतागृहांत पाण्याची सोय (बोअरवेल्स)...... पाच लाख
- अंगणवाडी केंद्र येथे बोअरवेल व प्युरीफायर बसविणे.... पाच लाख
- महिलांसाठी विविध कार्यक्रम घेणे व कार्यक्रम प्रसिद्धी करणे.... दोन लाख
- जागतिक महिला दिन कार्यक्रम...................................दोन लाख
- एकूण........................................................ ९१ लाख रुपये
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.