नाशिक

बिल्डर नरेश कारडाला दिलासा

CD
पान-२ बिल्डर नरेश कारडास दिलासा २३ कोटींच्या फसवणूकप्रकरणी सशर्त जामीन मंजूर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : कारडा इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक व बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यास अखेर दिलासा मिळाला आहे. २३ कोटींच्या फसवणूकप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या कारडा यांना नाशिक रोड न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर कारडा यास न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कॅप्री ग्लोबल कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी कारडा इन्फ्रास्ट्रक्चरने आनंदवली येथील प्रकल्प गहाण ठेवला होता. मात्र, कारडाने फिर्यादीची दिशाभूल करीत त्यांच्या मालकीचे ‘हरी निकेतन फेज २’ मधील २१ फ्लॅट, तीन दुकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे अतिरिक्त गहाण म्हणून बँकेकडे तारण ठेवले होते. फिर्यादीकडून ७२ लाख रुपये घेऊनही त्यांच्या संमतीशिवाय फ्लॅट तारण ठेवत तब्बल २३ कोटींचे कर्ज घेत त्यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित कारडा यास उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नाशिक रोड कारागृहात होता. या प्रकरणी गेल्या आठवड्यात कारडाच्या जामिनावर नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात युक्तिवाद झाला होता. त्या वेळी न्या. के. जी. जोशी यांनी प्रथमदर्शनी सदरील प्रकार दिवाणी स्वरूपाचा असून, सर्व पुरावे कागदोपत्री आहेत. संशयिताकडून काहीही हस्तगत करणे शिल्लक नसल्याचे निरीक्षक नोंदवून कारडाला दोन लाखांच्या जातमुचलक्यासह अटीं-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. १६-१ या आहेत अटी-शर्ती - आगामी तीन वर्षे किंवा खटला संपेपर्यंत तक्रारदाराच्या निवासी परिसरात बंदी ​- दर शुक्रवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत पोलिस ठाण्यात हजेरी ​- फिर्यादी वा साक्षीदारांशी संपर्क न साधणे - आठवड्याभरात पासपोर्ट न्यायालयात जमा करणे - न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत न सोडणे ​- अटींचे उल्लंघन केल्यास तत्काळ जामीन होणार रद्द ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik: नवी मुंबईत क्लस्टर नको, पुनर्विकासच! गणेश नाईक यांची ठाम भूमिका; सरकारला घरचा अहेर

Investment In IPL Team: आयपीएल टीममध्ये गुंतवणूक कशी कराल? कोणत्या संघाचे शेअर्स उपलब्ध? स्टेप बाय स्टेप माहिती...

Sangli Irwin Bridge : उद्‍घाटनाला 9 महिनेही झाले नाहीत अन् पुलावर पडले खड्डे! सांगलीतील आयर्विन पुलाची दुरवस्था; पहिल्याच पावसात 65 कोटींचा पूल उघडा पडला

Marathi News Live Updates : जंतरमंतरवरील लाठीचार्जवर गृहमंत्री अमित शहा लोकसभेत निवदेन देण्यास तयार; विरोधकांचा आक्रमक पवित्रा

Beed Farmer Guava Farming Success Story : पिंप्रीच्या शेतकऱ्याची 2 एकर पेरूबागेतून 27 लाखांची कमाई; पारंपरिक शेतीला फाटा, प्रयोगातून साधली किमया

SCROLL FOR NEXT