नाशिक

निदा खानच्या जामीनावर ३० ला सुनावणी

CD
फोटो घेणे ------------ निदा खानच्या जामिनावर ३० जूनला सुनावणी लोगो टीसीएस अत्याचार प्रकरण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २५ : बहुराष्ट्रीय टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीतील महिला अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिच्यासह तौसिफ अत्तार व दानिश शेख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे. निदा खान ही गर्भवती असल्याने जामिनासाठी तिने नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांत या प्रकरणी संशयित निदा खानसह तौसिफ अत्तार व दानिश शेख यांच्याविरोधात अत्याचार व धर्मांतराच्या प्रयत्नासह ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान पसार झाली होती. तब्बल ४० दिवसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. या प्रकरणी दोषारोपपत्रानंतर संशयितांनी पुन्हा न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली असता त्यावर दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्यावर गुरुवारी (ता. २५) सुनावणी होती; परंतु ती येत्या ३० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे निदा खानचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, निदा खान गर्भवती असल्याने सहानुभूतीच्या अनुषंगाने तिने न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती केली होती. त्याबाबत न्यायालयाने तिच्या वैद्यकीय अहवालाचे आदेश दिले होते. त्यानुसार हा अहवाल न्यायालयात सादर केल्याची शक्यता आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pitbull Attack Video पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Latest Marathi News Live Update : कलम २९ए(९) हे राजकीय पक्षाच्या नोंदणीनंतर लागू होते, परंतु त्यात नमूद केलेल्या माहितीपुरतेच ते मर्यादित आहे - न्यायासन

State Government: बंदीवान मच्छीमारांच्या कुटुंबांना मदत, ८९ दिवसांसाठी २६ हजार रुपये; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT