नाशिक

शहरातील नागरी समस्यांवर महापौर संतप्त

CD
पान चारला रिंगरोडच्या बातमीला क्लब करावी --- शहरातील नागरी समस्यांवरून महापौर संतप्त अयोध्या नगर, ऑटो नगरची पाहणी; कामांबाबत तातडीच्या सूचना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : शहरातील प्रलंबित नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी अयोध्या नगर आणि ऑटो नगर परिसराला भेट देत नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी विविध समस्यांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अयोध्या नगरातील अशोक नगर परिसरात गणपती मंदिराजवळ सांडपाणी व तुंबलेल्या गटारींची समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांनी या समस्यांमुळे होत असलेल्या त्रासाची माहिती महापौरांना दिली. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर महापौरांनी पुढील आठवड्यापर्यंत नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरणार नाही, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तातडीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. कामातील विलंब, नियोजनाचा अभाव आणि विविध विभागांतील समन्वयाच्या कमतरतेबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. दोन्ही परिसरातील महिला नागरिकांनी तुंबलेल्या गटारी आणि अस्वच्छतेची समस्या महापौरांसमोर मांडली. आरोग्य विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारींनंतर महापौरांनी संबंधित विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. गटारींची तातडीने साफसफाई करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Alephata Crime : मानसिक छळामुळे तरुणीने संपविले जीवन; शिक्षकावर गुन्हा दाखल

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT