नाशिक

महाराष्ट्र पणन महासंघ अध्यक्षपदी रोहित निकम

CD
NSK26H22520 --- महाराष्ट्र पणन महासंघ अध्यक्षपदी रोहित निकम उपशीर्षक इतिहासात प्रथमच भाजपकडे नेतृत्व सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन सहकारी शिखर संस्थेच्या (पणन महासंघ) अध्यक्षपदी रोहित निकम यांची, तर उपाध्यक्षपदी राहुल काकडे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या ७० वर्षांनंतर प्रथमच या महत्त्वाच्या सहकारी संस्थेच्या नेतृत्वाची धुरा भाजपशी संबंधित नेतृत्वाकडे आली आहे. मुंबई येथील पणन महासंघाच्या मुख्यालयात गुरुवारी (ता. २५) सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत रोहित निकम यांची अध्यक्षपदी आणि राहुल काकडे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहनिबंधक, सहकारी संस्था मुंबईचे शाहजी पाटील यांनी कामकाज पाहिले. रोहित निकम यांनी आजोबा बॅरिस्टर देवराव निकम आणि वडिलांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे नेत विविध संस्थांमध्ये नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक असून, जळगाव जिल्हा कृषी उद्योग व सर्व सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT