पान-३ संक्षिप्त
२०-१
जिल्हा बँकेसाठी
६७२ कोटींची तरतूद
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा परवाना वाचविण्यासाठी आवश्यक ६७२ कोटींचे शेअर कॅपिटलसाठी शासनाने पुरवणी मागण्यांमधे आर्थिक तरतूद केली आहे. त्यामुळे आता बँकेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा बँक सध्या प्रचंड अडचणीत आहे. बँकेचा परवाना रद्द होण्याची वेळ आल्याने त्यावर तोडगा काढणे आवश्यक होते. जिल्हा बँकांना नऊ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी या बॅंकांना मदत करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यात नाशिक जिल्हा बॅंकेला ६७२ कोटी, नागपूर बॅंकेला ८१ कोटी, धाराशिव बॅंकेला ७४ कोटी, बुलडाणा बॅंकेला ३०० कोटींची मदत दिली. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मदतीला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर या मदतीचा शासन आदेशही निघाला.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.