मेनच्या बाजूला सिंगल कॉलम
---
रावेर तालुक्यातील
४ मंडळांत अतिवृष्टी
जळगाव, ता. २५ : रावेर तालुक्यात बुधवारी (ता.२४) झालेल्या मुसळधार पावसामुळे नऊ महसूल मंडळांपैकी चार मंडळांत शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडून अतिवृष्टी झाली. तालुक्यात सर्वाधिक पाऊस केऱ्हाळा मंडळात २०३ मि.मी, तर सर्वात कमी सावदा मंडळात ४ मि. मी. पडला. या पावसामुळे मंगरूळ धरण ओव्हर फ्लो झाले आहे. इतर धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.
तालुक्यात बुधवारी(ता.२४) दुपारी एकपासून तब्बल तीन तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्री दहानंतर पावसाची रिपरिप सुरू होती. तालुक्यातील सर्वच नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले होते. पावसाने गुरुवारी दुपारपर्यंत उसंत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.