धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
लोगो छायाचित्र क्रमांक ः 01017 (संग्रहीत)
--
ऐन पेरणीच्या तोंडावर खतासाठी वणवण
-
युरिया हवा असेल तर जोडखते घ्या; पिंपळनेर क्षेत्रात ‘लिंकिंग’मुळे बळीराजा हैराण
सकाळ वृत्तसेवा
सामोडे, ता. २५ : मॉन्सूनच्या आगमनाने खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत झालेल्या असतानाच पिंपळनेर (ता. साक्री) परिसरातील शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागत आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर रासायनिक खते मिळेनाशी झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच स्थानिक खत विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने विक्री सुरू असून, युरिया हवा असल्यास इतर १० गोण्या जोडखते (लिंकिंग) घेण्याची सक्ती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आर्थिक लुटीमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप असून, कृषी यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.
-
अनेक दुकानांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही तो शेतकऱ्यांना दिला जात नसल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारले जात असून दरांमध्ये तफावत आढळत आहे. पेरणीचा कालावधी अत्यंत मर्यादित असतो, अशा वेळी खते मिळाली नाहीत तर उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती आहे. या मनमानीचा सर्वाधिक फटका अल्पभूधारक व आदिवासी शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे कृषी यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने सर्व केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
-
शेतकऱ्यांच्या मागण्या
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या अशा : सर्व खत विक्री केंद्रांवरील साठ्याची तात्काळ तपासणी करून उपलब्ध साठा, दर व गुणवत्तेचा फलक दुकानाबाहेर लावण्यात यावा. युरियासोबत इतर खते घेण्याची बेकायदेशीर सक्ती (लिंकिंग) तातडीने थांबवून विनाअट खत पुरवठा करावा. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करून गुन्हे दाखल करावेत. पेरणीच्या मुख्य हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागणे प्रशासकीय अनास्थेचे लक्षण आहे. विक्रेत्यांनी ‘लिंकिंग’चा गैरउद्योग तत्काळ थांबवावा. कृषी यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दोन दिवसांत दखल घेतली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
-
१४-१
...कोट...
१४-१
खते खरेदी करत असताना विक्रेते कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना सक्ती करू शकत नाही. शेतकऱ्यांनी आवश्यक खते गरजेनुसारच खरेदी करावीत. कुणी विक्रेता यासाठी काही सक्ती करत असेल किंवा अन्य खते किंवा अन्य उत्पादन घ्यावेच लागेल, असा बेकायदेशीर आग्रह धरत असेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तशी लेखी तक्रार नोंदवावी. तक्रारीची शहानिशा करून संबंधित विक्रेत्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- सूरज जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.