नाशिक

धुळे लोककल्याण मेळावा

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 22522 धुळे : महापालिकेतर्फे पीएम स्वनिधी लोककल्याण मेळाव्यात कर्ज मंजुरीची पत्रे, ''क्यूआर कोड'' स्वीकारताना लाभार्थी. शेजारी करुणा डहाळे, बँक अधिकारी व मनपा कर्मचारी. -- ‘पीएम स्वनिधी’चा लाभ घ्यावा - लोककल्याण मेळाव्यात कर्ज मंजुरी पत्र, क्यूआर कोड वितरण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी योजना २.० अंतर्गत महापालिकेतर्फे येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात लोककल्याण मेळावा झाला. पथविक्रेत्यांच्या (फेरीवाले) आर्थिक व सर्वांगीण विकासासाठी ही योजना उपयुक्त असून, शहरातील अधिकाधिक लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी केले. मुख्य मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, नगरसेवक गणेश जाधव, कृपेश नांद्रे आदी उपस्थित होते. ‘स्वनिधी से समृद्धी’ अभियानासह केंद्र सरकारच्या सुरक्षा विमा योजना, मातृवंदना योजना, जनधन योजना, श्रमयोगी मानधन योजना आणि ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेबाबतही पथविक्रेत्यांना मेळाव्यात माहिती देण्यात आली. - १४-१ जागेवरच कर्ज मंजुरी मेळाव्यात ५० लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज मंजुरी पत्रांचे, दोन लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डचे, तर १२ लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी ‘क्यूआर कोड’चे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. फेरीवाल्यांनी मांडलेल्या विविध अडचणी व समस्यांचे उपस्थित बँक व्यवस्थापकांनी जागेवरच तत्काळ निराकरण केले. या मेळाव्यात डिजिटल सादरीकरणाद्वारे (व्हिडिओ प्रेझेंटेशन) योजनेची यशोगाथा दाखवण्यात आली. - १४-१ मान्यवरांची उपस्थिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एम. एम. ढेले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व फेरीवाला समितीचे पदाधिकारी नितीन बंग, समाज विकास अधिकारी मीना सातभाई यांच्यासह स्टेट बँक, युनियन बँक, यूको बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी उपस्थित होते. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनात मेळावा झाला. समुदाय संघटक सुनील सरदार, धम्मदीप सावंत, छाया पाटील, सुनिता निकम, मोहन गवळी आणि संगीता जांभळे यांनी संयोजन केले. - १४-१ ...चौकट... १४-१ कोट्यवधींच्या कर्जवाटपाचा टप्पा पार अतिरिक्त आयुक्त डहाळे यांनी मार्गदर्शनात योजनेचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि लाभार्थी पात्रता निकषांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की धुळे मनपाने पहिल्या टप्प्यात ९ हजार ४४९ लाभार्थ्यांना ९ कोटी ५१ लाख रुपयांचे, तर दुसऱ्या टप्प्यात ३ हजार ७२ लाभार्थ्यांना ६ कोटी ५९ लाख रूपयांचे कर्ज वितरित केले आहे. तिसऱ्या टप्प्यात ४८६ लाभार्थ्यांना २ कोटी ४५ लाख रुपयांचे कर्जवाटप पूर्ण झाले आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी ७ हजार ५१ लाभार्थ्यांना यापूर्वीच लाभ देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT