पान-२ साठी
---------------
NSK26H22523
नाशिक ः जागतिक ऑलिम्पिक दिन केटीएचएम महाविद्यालयात गौरविण्यात आलेल्या विविध खेळाडूंसह मान्यवर पदाधिकारी.
--------------------
ऑलिम्पिक दिनी विविध खेळाडूंचा गौरव
-----------
ऑलिम्पिक डे रनसह ‘स्पोर्ट्स न्यूट्रिशन’बाबत केटीएचएममध्ये मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २५ ः जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त केटीएचएम महाविद्यालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, क्रीडा भारती, अभिनव बालविकास मंदिर नाशिक आणि योगिक सायन्स असोसिएशनतर्फे महाविद्यालयात विविध क्रीडा व प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. यावेळी महाविद्यालयातर्फे विविध क्षेत्रातील खेळाडूंचा गौरव करण्यात आला.
--------------
‘ऑलिम्पिक डे रन’ने कार्यक्रमाला सुरवात झाली. ऑलिंपियन रोइंगपटू व अर्जुन पुरस्कार विजेता दत्तू भोकनळ, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू आकाश शिंदे, खो-खो विश्वचषक खेळाडू रेशमा राठोड यांच्यासह विविध खेळाडूंचा गौरव सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ‘स्पोर्ट्स न्यूट्रिशन’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान झाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा भारतीचे अध्यक्ष रवींद्र नाईक, प्राचार्या डॉ. के. एम. अहिरे, अभिनवच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, स्पोर्ट्स न्यूट्रिशन तज्ज्ञ सई सेफल, कार्यक्रम समन्वयक क्रीडा संचालिका डॉ. मीनाक्षी गवळी, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, भाऊसाहेब जाधव, उत्तरा खानापूरे, नेहा सुरणार, अरविंद चौधरी तसेच क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, चित्रा उदार, प्रीती करवा आदी उपस्थित होते.
मॅरेथॉन चौकातून ऑलिम्पिक चिन्हे व खेळाडूंना प्रोत्साहन देणारे फलक हातात घेऊन अभिनव बालविकास नाशिक व केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत ऑलिम्पिक डे रनमध्ये सहभाग नोंदविला. यानंतर रावसाहेब थोरात सभागृहात मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. रवींद्र नाईक, सुनंदा पाटील, प्राचार्या अहिरे यांनी यशस्वी खेळाडू होण्यासाठी वेळेचे नियोजन आणि शिस्त आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. गवळी यांनी जागतिक स्तरावर ऑलिम्पिक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. पूनम महाजन यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. वैभव भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश कदम यांनी आभार मानले.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.