---------
NSK26H22525
सिडको ः जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सिडको महाविद्यालयात प्राचार्य डॉ. सुरेश जाधव आणि पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेताना प्राध्यापक व विद्यार्थी.
----------------
३०-२
सिडको महाविद्यालयामध्ये
अमली पदार्थ विरोधी दिन
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२६ ः मविप्र समाजाच्या सिडकोतील कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयातर्फे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत विशेष व्याख्यानमाला, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ आणि जनजागृती रॅली काढण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंबडचे पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत उपस्थित होते.
उपप्राचार्य डॉ. सीताराम निकम, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. दीपक देवरे, आयक्यूसी समन्वयक डॉ. रविराज वटणे, ज्येष्ठ प्राध्यापक मोहन पवार, विद्यार्थी कल्याण अधिकारी व संयोजक डॉ. मिलिंद थोरात, जिमखाना विभाग प्रमुख व संयोजक प्रा. हेमंत काळे, एनसीसी प्रमुख प्रा. मयुरी देशमुख आणि एनएसएस प्रमुख प्रा. महेश जाधव, स्कॉलरशिप विभाग कनिष्ठ लिपिक प्रियंका दातीर उपस्थित होते.
डॉ. थोरातांनी अमली पदार्थ विरोधी दिनाचे महत्त्व आणि आजच्या काळातील गरज सर्वांसमोर मांडली. यानंतर त्यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली. प्राचार्य डॉ. जाधव, पोलिस निरीक्षक राजपूत यांनीही मार्गदर्शन केले. व्याख्यान आणि शपथेनंतर महाविद्यालय परिसरात ''जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन'' निमित्त रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचे विविध संदेश देणारे फलक (पोस्टर्स) तयार करून, परिसरात दाखवून व घोषणाबाजी करत हा दिवस साजरा केला. जिमखाना प्रमुख व संयोजक प्रा. काळे यांनी सूत्रसंचालन केले. एनसीसी प्रमुख प्रा. मयुरी देशमुख यांनी आभार मानले. श्रीमती प्रियंका दातीर, सोपान बिडगर, वैभव खटांगळे, प्रिन्स भगत, गोरक्ष दातीर आणि सर्व एनसीसी कॅडेट्सनी सहाकार्य केले.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.