नाशिक

आणीबाणीच्या आठवणींना उजाळा

CD
फोटो : H22511 --------- आणीबाणीत संघर्षरत कार्यकर्त्यांचा भाजपकडून सत्कार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : २५ जून १९७५ रोजी देशात लादलेल्या आणीबाणीस ५१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नाशिकमध्ये भाजपतर्फे आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या आणि भूमिगत राहून संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गणपत बोरसे, डॉ. बसंतीलाल गुजराथी, शरद गर्गे, बापूराव शिनकर, कमलाकर पिंगळे, प्रकाश कुलकर्णी, सुरेश पिंगळे, गोविंदराव यार्दी, परशुराम दळवी, अण्णा गजभार, नाना वाणी, सुषमा सराफ, मंगला जोशी, राजाभाऊ व निशिगंधा मोगल यांच्यासह ३० हून अधिक जणांच्या घरी जाऊन त्यांना गौरवण्यात आले. आणीबाणी हा लोकशाहीवरील कलंक असल्याचे सांगत गणपत बोरसे यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. देशहितासाठी संघर्ष केला, आमच्या कुटुंबाची अवहेलना होऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, सुनील देसाई, काशिनाथ शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, रश्मी हिरे- बेंडाळे, प्रवीण भाटे, स्वाती भामरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT