नाशिक

खेडगावच्‍या जवाहर नवोदयमध्ये अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु

CD
शहर-जिल्‍हा ------------- ‘जवाहर नवोदय’मध्ये अकरावी प्रवेश सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ ः खेडगाव (ता. दिंडोरी) येथील पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अकरावी विज्ञान आणि कला शाखेतील रिक्‍त जागांवर प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी या मोफत व उच्च दर्जाच्या निवासी शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाच्‍या प्राचार्यांनी केले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) किंवा इतर मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या परीक्षेतील गुणांच्या आधारे हे प्रवेश दिले जाणार आहेत. त्‍यासाठी उमेदवाराचा जन्म १ जून २००९ ते ३१ जुलै २०११ च्या दरम्यान असावा. विद्यार्थ्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नाशिक जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. दहावीत एकूण किमान ६० टक्‍के गुण (प्रथम श्रेणी) असणे आवश्यक आहे. विज्ञान किंवा कला शाखेत गणित विषय निवडायचा असल्यास दहावीत गणित विषयात किमान ६० टक्‍के गुण अनिवार्य आहेत. विद्यार्थ्यांची निवड दहावीच्या गुणांवर आधारित तयार होणाऱ्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल. यामध्ये सीबीएसई संलग्न शाळांमधील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. जागा रिक्त राहिल्यास इतर राज्य मंडळांतील विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज विद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन किंवा विद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. पूर्ण भरलेला अर्ज जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव येथे प्रत्यक्ष जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्‍यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

"तयारी सुरू..." Vaibhav Sooryavanshi च्या अवघ्या दोन शब्दांच्या पोस्टने वेधलं लक्ष; Video शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Pune Crime : धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुवर गुन्हा दाखल

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT