३६-४
शिक्षक, मुख्याध्यापकांना पदोन्नतीचे ‘गिफ्ट’
-----------
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ४२९ जणांचे खांदेपालट
----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्रलंबित असलेली पदोन्नतीची प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन शिक्षण विभागाने समुपदेशनाने त्यांना बदली आदेश दिले.
विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे शिक्षण विभागाची पदोन्नती प्रक्रिया थांबली होती. आचारसंहिता संपताच प्राथमिक शिक्षण विभागाने गणित व विज्ञान विषयाच्या पदवीधर शिक्षकांना पदस्थापना दिली. प्राथमिक व पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना विस्तार अधिकारी वर्ग-३ या पदावर पदोन्नती दिली. अशा स्वरूपाचा १९ व्यक्तींना लाभ देण्यात आला. सहावी ते आठवीच्या पदवीधर भाषा विषयाच्या १९६ शिक्षकांना तसेच प्राथमिक शिक्षक व पदवीधर, मुख्याध्यापक यातून ६३ केंद्रप्रमुख झाले. शिक्षण विभागांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होऊन १२२ शिक्षकांनी केंद्रप्रमुख पदोन्नतीचा लाभ मिळवला. एकूणच, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख अशा एकूण ४२९ व्यक्तींना पदोन्नतीचा लाभ मिळाला. शिक्षण विभागाने २३ ते २५ जून यादरम्यान पदोन्नतीची प्रक्रिया व समुपदेशन प्रक्रिया राबवली. शिक्षकांनी संमती दिल्यानंतर त्यांना नवीन ठिकाणचा नियुक्ती आदेश पारित करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या स्वाक्षरीने आदेश देण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आदींनी ही प्रक्रिया राबविली.
---------------
१६-१
यांना मिळाले ‘गिफ्ट’
२९ : गणित व विज्ञान विषयाचे पदवीधर शिक्षक
१९ : शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख बनले विस्तार अधिकारी
१९६ : भाषा विषयाचे पदवीधर शिक्षक
६३ : शिक्षक व मुख्याध्यापक यातून बनले केंद्रप्रमुख
१२२ : शिक्षक खातेंतर्गत परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी पदोन्नती
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.