नाशिक

श्रॉफ हायस्कूलमध्ये ''फादर्स डे'' निमित्त पत्रलेखन स्पर्धा

CD
NSK26H22533 नंदुरबार : पत्रलेखन स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी. --- श्रॉफ हायस्कूलमध्ये ‘फादर्स डे’निमित्त ‘एक पत्र वडिलांसाठी’ उपक्रम नंदुरबार, ता. २६ : येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचालित श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘फादर्स डे’ निमित्त पत्रलेखन स्पर्धा झाली. सार्वजनिक शिक्षण समितीच्या समन्वयक सुषमा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक ऑफ इंडिया व श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यमाने शाळेत ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. या वेळी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एक पत्र वडिलांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. समाज माध्यमांच्या काळात पत्र लेखनाचे महत्त्व तरुण पिढी विसरताना दिसत आहे. पत्रलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. ढासळत्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आई-वडिलांप्रति विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदर कायम राहावा, तसेच पत्रलेखनाचे महत्त्व अबाधित रहावे हा यामागील उद्देश होता. आपल्या वडिलांना पत्र लिहीत असताना, त्याच्या आयुष्यावर दृष्टिक्षेप टाकत असताना विद्यार्थी भावुक झाले. या वेळी प्राचार्य प्रशांत बागलू, भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सीनिअर ब्रँच मॅनेजर कैलास गायधनी, डेव्हलपमेंट मॅनेजर प्रतिभा खैरनार, भिकन सोनवणे, विकी रायते आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी वैभव पाटील, हेमंत लोहार यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

Mangalwedha News : फार्मर आयडी असूनही पोर्टलवर दाखवत नसल्याने कर्जमाफी लटकली

SCROLL FOR NEXT