नाशिक

सिंहस्थाच्या खर्चानंतरही महापालिका ‘श्रीमंत’

CD
टूडे साठी ----------- सिंहस्थाच्या खर्चानंतरही महापालिका श्रीमंत ठेवींचा आकडा २५६१ कोटींवर; आर्थिक व्यवस्थापन सक्षम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कामांचा प्रचंड आर्थिक बोजा असतानाही महापालिकेची तिजोरी मजबूत असल्याचे समोर आले आहे. आर्थिक नियोजनामुळे महापालिकेच्या विविध बँकांतील ठेवी २५६१ कोटी रुपयांवर पोचल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत या ठेवींत तब्बल १२०० कोटींची वाढ नोंदवली गेली आहे. गतवर्षी हरित रोख्यांमधून २०० कोटी, म्युनिसिपल बॉण्डमधून २०० कोटी असे एकूण ४०० कोटी उभारण्यात आले. त्याशिवाय अखर्चिक निधी, करसवलत योजनेतून जमा झालेले ११४ कोटी, जीएसटी अनुदानाचे २५० कोटी आणि ३१ मार्चअखेर शिल्लक ३०० कोटींचा निधी प्रशासनाने अल्पमुदतीच्या ठेवींत गुंतवला. त्यामुळे केवळ अडीच महिन्यांत ठेवींचा आकडा १२०० कोटींनी वाढला. ३१ मार्च २०२४ ला महापालिकेच्या ठेवी १३९३ कोटी होत्या. ३१ मार्च २०२५ ला त्या १५२१ कोटींवर गेल्या. काही ठेवींचे रोखीकरण करून विकासकामांची देयके दिल्यानंतरही १५ जून २०२६ पर्यंत ठेवी २५६१ कोटींवर पोहोचल्या आहेत. महापालिकेने आठ राष्ट्रीयकृत बँकांसह एचडीएफसी व आयसीआयसीआय या खासगी बँकांतही ठेवी ठेवल्या आहेत. सुरक्षा अनामत, घसारा निधी, विकास शुल्क, भविष्यनिर्वाह निधी, निवृत्तिवेतन निधी, ग्रीन बॉण्ड, सिंहस्थ मनपा हिस्सा, कामगार कल्याण निधी, पीपीपी हॅम प्रोजेक्ट अशा विविध हेडखालील निधी ठेवींत गुंतवला जातो. या ठेवींमधून महापालिकेला व्याजापोटीही उत्पन्न मिळते.मात्र यातील मोठा हिस्सा सिंहस्थ कामांसाठी राखीव आहे. कामे पूर्ण होताच देयके अदा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने ठेवींचे रोखीकरण करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या योजना व इतर बंधनकारक बाबींसाठीचा निधी वगळता उर्वरित रक्कम सिंहस्थासाठीच खर्च होणार आहे. सिंहस्थाचा खर्च समोर असतानाही ठेवी वाढल्याने महापालिकेचे आर्थिक व्यवस्थापन सक्षम असल्याचे दिसून येते. मात्र आगामी काळात सिंहस्थाची देयके द्यावी लागणार असल्याने ठेवी मोडण्याचे देखील नियोजन आहे. ---------कोट---------- महापालिकेकडे विविध मार्गाने येणारा निधी तातडीने खर्च न करता गरजेनुसार राष्ट्रीयकृत बँकांत अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या ठेवींत गुंतवला जातो. मुदत संपल्यावर रोखीकरण केले जाते किंवा पुन्हा नव्याने गुंतवणूक केली जाते. - दत्तात्रेय पाथरूट, मुख्य लेखा व वित्त अधिकारी. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT