नाशिक

पल्स पोलिओ मोहीम

CD
टूडे साठी -------------- पल्स पोलिओ मोहिमेत दोन बालकांना डोसचे नियोजन नाशिक, ता. २६ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिकेकडून रविवारी (ता. २८) विशेष मोहीम राबवली जाणार आहे. पाच वर्षांखालील २ लाख ७ हजार ५६० बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. मोहिमेसाठी सिटी टास्क फोर्सची बैठक पार पडली. बैठकीत मोहिमेच्या सूक्ष्म नियोजनाचा आढावा घेण्यात आला. शहरभरात ८३८ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत. याशिवाय रेल्वे स्थानके, बसस्थानके, बाजारपेठा येथे ५८ ट्रान्झिट टीम आणि स्थलांतरित वस्त्या, वीटभट्टी कामगारांच्या वसाहतींसाठी ३४ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत बूथवर लसीकरण होईल. त्या दिवशी डोस न घेऊ शकलेल्या बालकांसाठी २९ जून ते ३ जुलैदरम्यान आयपीपीआय अंतर्गत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम व नाईट टीमच्या माध्यमातून वंचित बालकांपर्यंत पोहोचून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील पाच वर्षांखालील सर्व बालकांना जवळच्या बूथवर नेऊन पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT