नेव्हिगेशन
जळगावात आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा
जळगाव, ता. २६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शहरात सार्वजनिक युवा महोत्सव समितीतर्फे ‘स्वराज्याचा सोहळा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा..'' या संकल्पनेवर आधारित हा महासोहळा शनिवारी (ता.२७) आयोजित केला आहे.
येथील बालगंधर्व खुले नाट्यगृहाशेजारील श्री गायत्री मंदिर येथे हा सोहळा होईल. या सोहळ्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने एक भव्य ''रक्तयज्ञ महारक्तदान शिबिर'' देखील आयोजित करण्यात आले आहे. अस्सल लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ''सार्वजनिक युवा लोकोत्सव समिती''ची स्थापना करण्यात आली आहे. सर्वांनी या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे मनःपूर्वक आवाहन ''सार्वजनिक युवा महोत्सव समिती''ने जळगावमधील सर्व शिवभक्तांना व नागरिकांना केले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.