नाशिक

सिंहस्थात धावणार दीडशे विशेष रेल्वे

CD
पान-३ -------- तयारी सिंहस्थाची--लोगो ------- सिंहस्थात धावणार दीडशे विशेष रेल्वे ----------- तयारी कुंभमेळ्याची : देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी सोयी-सुविधा ----------- सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे १५० विशेष रेल्वे नियोजन केले आहे. उत्तर व दक्षिण भारतामधून रेल्वेगाड्या नाशिकमध्ये दाखल होतील. या विशेष गाड्यांमधून येणाऱ्या भाविकांसाठी स्थानक परिसरात विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये अतिरिक्त फलाट, होल्डिंग एरिया, पादचारी पुलासह गाड्यांच्या पार्किंगसाठी लुपलाइनचे काम प्रगतिपथावर आहे. -------------- नाशिक-त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्यास ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. यंदाच्या कुंभात तीन कोटी भाविक रेल्वेने जिल्ह्यात दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतामधून येणाऱ्या भाविकांचा समावेश असेल. भाविकांच्या सोयीसाठी दिल्ली, प्रयागराज, पाटणा, कामाख्या, हावडा, जयपूर, बिकानेर तसेच राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेड या महत्त्वाच्या स्थानकांवरून विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचे नियोजन आहे. तसेच कमी अंतराच्या प्रवासासाठी मेमू सेवा चालविण्यात येणार आहे. १६-१ नाशिक रोडला पाचवा फलाट कुंभमेळ्यात नाशिक रोडवरील ताण हलका करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उत्तर व दक्षिण भारत असे दोन टप्प्यांत विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे. या दोन्ही विभागांतून प्रत्येकी ७५ विशेेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नाशिक रोड स्थानकावर पाचव्या फलाटाच्या निर्मितीसह विविध सुविधांची कामे प्रगतिपथावर आहेत. स्थानकावरील एक ते तीन प्लॅटफॉर्मवरून नियमित गाड्या, तर चौथ्या प्लॅटफॉर्मवरून सिंहस्थातील विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. --- विशेष गाड्यांसाठी विशेष नियोजन रेल्वे मंत्रालयाने सिंहस्थात येणाऱ्या विशेष रेल्वेच्या थांब्यासाठी नियोजन केले आहे. उत्तर भारतामधून येणाऱ्या रेल्वेगाड्या ओढा, कसबे सुकणे व खेरवाडी स्थानकावर थांबविण्यात येतील. तसेच दक्षिणेकडील रेल्वे नाशिक रोड व देवळाली स्थानकांवर थांबतील. दरम्यान, गुजरातकडून येणाऱ्या रेल्वेगाड्या मुंबई-कल्याणमार्गे नाशिकमध्ये पोहोचतील. --- नवीन लुपलाइनची निर्मिती नाशिक रोड स्थानकावर १२ मीटर आणि सहा मीटर रुंदीचे दोन नवीन फूट ओव्हरब्रिज, शेड विस्तार आणि सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. देवळालीमध्ये ५५५ मीटरचा नवीन उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. ओढा स्थानकासाठी सहा स्टेबलिंग लाइन्सचे काम सुरू आहे. तसेच अतिरिक्त लुपलाइन्सचे काम रेल्वेतर्फे करण्यात येत आहे. खेरवाडीत आयलंड प्लॅटफॉर्म व कसबे सुकेणे येथे नवीन लुपलाइन्सची उभारणी सुरू आहे. --- ठळक मुद्दे -नाशिक रोडला पूर्व बाजूने नवी इमारत -स्थानकावर १२ मीटर रुंद रूफ प्लाझा -अतिरिक्त फलाटासह यार्ड आधुनिकीकरण -देवळालीत दोन अतिरिक्त फलाट व पादचारी पूल -पाचही स्थानकांवर प्रवाशांसाठी निवारा शेड -पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था -होल्डिंग एरिया म्हणून गुड्स शेडचा वापर -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT