नाशिक

संत मुक्ताई पालखीचे

CD
संत मुक्ताई पालखीचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान भक्तांचा उत्साह शिगेला; संत ज्ञानोबा, तुकोबांचा होणार जयघोष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : शहरातील श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) संचलित श्री संतमुक्ताबाई राम पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी मंगळवारी (ता.२९) वटपौर्णिमेस पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पालखी जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर येथून २८ जूनला सायंकाळी पाचला कुमारिका मुलींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी पूजन होईल. हरिपाठ व भजन आरती होऊन सायंकाळी पाचला पालखी निघेल. नंतर भोईटे गढी, कोल्हेवाडा, तळेलेवाडा मार्गे गोपाळपुऱ्यातील श्री सद्गुरू बाबजी महाराज समाधी येथे अभंग, आरती होऊन विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक, पंत नगर, जोशी पेठ मार्गे श्री सद्गुरू अप्पा महाराज समाधी मंदिरात येईल. भजन, कीर्तन आरती होऊन पालखीचा मुक्काम रात्री श्री सद्गुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे राहील. येथूनच मंगळवारी (ता. २९) वटपौर्णिमेला सकाळी आठ वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होईल. यापूर्वी पहाटे प्रभू श्रीराम, संत मुक्ताईंच्या पादुका व श्रीसद्गुरू अप्पा महाराजांच्या समाधीचे पूजन, अभंग आरती होऊन सकाळी साडेसातला पालखीस माल्यार्पण होईल. ज्ञानोबा, तुकोबा व मुक्ताईंच्या नामघोषात पालखीचे सकाळी आठला पंढरीकडे प्रस्थान होईल. पालखी कंवरराम चौक येथे भक्ती शक्ती सोहळा होऊन पंचमुखी हनुमान मंदिर, सिंधी कॉलनी, डी मार्ट मार्गे मेहरूण शिवारातील शिवाजी उद्यानाजवळील संत मुक्ताई पादुका मंदिर येईल. दुपारी अभंग, आरती होऊन अकराला मंगेश महाराज यांच्याहस्ते संत मुक्ताईंच्या पादुकांना माल्यार्पण होऊन पालखी शिरसोलीकडे मार्गस्थ होईल. चौकट पालखीचा मुक्काम असा शिरसोली, वावडदा, दुसखेडे, पाचोरा, लोहटार, कजगाव, रांजणगाव, मुंडवाडी, चापानेर, बोरगाव, खुलताबाद, तु.खराडी, अमळनेर प्रवरासंगम, नेवासे, वडाळा, जेऊर, नगर, रूईछत्तीसी, मिरजगाव, करमाळा, मांगी, करमाळा, स्टेशन जेऊर, वांगी क्रमांक १, टेंभुर्णी, करकंब, पवारवस्ती. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT