NSK26H22552
नंदुरबार : नशामुक्ती पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नंदकिशोर सूर्यवंशी, अविनाश सोनवणे, सुंदरसिंग वसावे, विवेकानंद चव्हाण, डॉ. चंद्रकांत जोशी, ॲड. सीमा खत्री, डॉ. मधुकर देसले.
---
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे
नशामुक्ती पंधरवड्याचा समारोप
नंदुरबार, ता. २६ : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग आणि भाग्यचैतन्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित आनंदवन व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्र नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती पंधरवडा साजरा करण्यात आला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील शाळा, महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, आरोग्य रुग्णालय, पोलिस विभाग, अंगणवाडी, तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जिल्हा परिषद, विधिसेवा प्राधिकरण, बसस्थानक आणि रेल्वेस्थानक आदी ठिकाणी व्यसनमुक्तीपर जनजागृती करण्यात आली. यानिमित्त व्यसनमुक्तीवर माहितीपुस्तिका वाटप करण्यात आल्या. व्यसनमुक्तीबाबत पोस्टर प्रदर्शन, घोषवाक्य, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, अमली पदार्थांची होळी, व्यसनमुक्ती रॅली आयोजित करण्यात आली. व्यसनमुक्ती केंद्रात दाखल रुग्णांची आरोग्य तपासणी करून समुपदेशन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आणि अमली पदार्थविरोधी दिनानिमित्ताने व्यसनमुक्ती पंधरवड्याचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमास ॲड. महाजन, ॲड. सीमा खत्री, ॲड. बिरारे, ॲड. वसावे प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. ॲड. बिरारी यांनी मार्गदर्शन केले. व्यसनमुक्तीचा संकल्प करू या, असा संदेश त्यांनी दिला.ॲड. सीमा खत्री यांनी, मानवी समाज आणि देशाला सक्षम करण्यासाठी व्यसनमुक्त राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी, निरीक्षक अविनाश सोनवणे, सामाजिक न्याय सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, विवेकानंद चव्हाण, डॉ. चंद्रकांत जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. नितीन सनेर यांनी सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मधुकर देसले यांनी आभार मानले. तेजस देसले, शीतल नुकते, सुभाष कोकणी, लक्ष्मण बागूल, कल्पना वळवी, मधू सोनेरी आदींनी यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.