नाशिक

दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा कडक ऊन

CD
दोन दिवसांच्या पावसानंतर पुन्हा ऊन (उपशीर्षक) जिल्ह्यात अनेक भागात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : जिल्‍ह्यात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. यानंतर पावसाने ब्रेक घेताच पुन्हा कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सकाळी काहीसे ढगाळ वातावरण असताना दुपारी मात्र कडक ऊन पडत आहे. दरम्‍यान, पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पंधरा दिवस उशिराने मॉन्सूनच्‍या पावसाचे आगमन झाले होते. जिल्‍ह्यात सलग दोन दिवस पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. तर पावसामुळे काही काळ दिलासा मिळाल्यानंतर गुरुवारपासून (ता.२५) पुन्‍हा पाऊस गायब झाला आहे. दुपारच्‍या वेळी कडक ऊन पडत असल्‍याने अचानक वाढलेल्या उन्हामुळे वातावरणात दमटपणा वाढला आहे. काही भागात दमदार पाऊस झाला असून काही भागात मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. चौकट पेरण्यांची लगबग जिल्‍ह्यात मॉन्सूनच्‍या पावसाचे २२ जूनला आगमन झाले. यानंतर २२ व २३ जून असा दोन दिवस चांगला पाऊस झाला. काही भागात जोरदार पाऊस झाल्‍याने नदी-नाल्‍यांना पूर आला होता. तर काही भागात तुरळक स्‍वरूपाचा पाऊस झाला आहे. सलग दोन दिवसांच्‍या पावसामुळे जिल्‍ह्यात रखडलेल्‍या पेरण्यांना सुरवात झाली होती. बळीराजा पेरणीच्‍या कामाला लागला आहे. आता दोन झाले पाऊस नसला तरी देखील बळीराजा पेरणीचे काम लगबगीने करत असल्‍याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT