फोटो :H22557
--------------
‘अग्निशमन’चे १०५
कर्मचारी मानधन तत्त्वावर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : महापालिकेच्या अग्निशमन विभागात तीन वर्षांपासून अत्यंत अल्प वेतनावर फायरमन म्हणून सेवा देणाऱ्या १०५ कर्मचाऱ्यांना अखेर मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचा कर्मचाऱ्यांनी जाहीर सत्कार केला.
तीन वर्षांपासून हे कर्मचारी आग, पूर, इमारत कोसळणे अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत जिवाची पर्वा न करता नाशिककरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत होते. मात्र त्यांना मिळणारे वेतन अत्यंत तुटपुंजे होते. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची वा किमान मानधन वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती.या प्रश्नावर सुधाकर बडगुजर यांनी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाने १०५ कर्मचाऱ्यांना मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. नियुक्तीपत्र मिळताच कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांनी बडगुजर यांची भेट घेऊन आभार मानले व सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना बडगुजर म्हणाले, अनेक बैठका घेतल्या, प्रसंगी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. या सर्व प्रयत्नांचे हे फलित आहे. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाची प्रशासनाने दखल घेतली, हे महत्त्वाचे आहे. भविष्यातही कर्मचाऱ्यांच्या वेतन, सेवा, सुरक्षा यांसारख्या प्रश्नांसाठी अशाच पद्धतीने लढा देईन व त्यांना न्याय मिळवून देईन.
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.