नाशिक

''उत्सव शिक्षणाचा''मधून जिल्हा परिषद शाळांना नवी उभारी!

CD
पान- २- ४ (मालेगाव अंकाला पण द्यावी, कॉमन घेणे) -------- 22558 जळगाव (निंबायती) : नवी मुंबईच्या आर. बी. जी. फाऊंडेशनतर्फे येथील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याच्या वाटपप्रसंगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे. शेजारी महेंद्र पाटील, सरपंच वाल्याबाई पटांगरे, योगेश दुकळे आदी. --------- ''उत्सव शिक्षणाचा''मधून जिल्हा परिषद शाळांना नवी उभारी आर.बी.जी. फाऊंडेशनचा पुढाकार; विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता निर्माण व्हावी, शिक्षणाची गोडी वाढावी आणि शाळांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने नवी मुंबईच्या आर. बी. जी. फाऊंडेशनने सुरू केलेल्या ''उत्सव शिक्षणाचा; आनंद विद्यार्थ्यांचा'' या अभिनव उपक्रमाला मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील ६ जिल्हा परिषद शाळांतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. आर.बी. जी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी फाऊंडेशनने पहिल्या टप्प्यात जळगाव (निंबायती) परिसरातील शाळांमध्ये हा उपक्रम हाती घेतला आहे. याप्रसंगी श्रीमती. गेठे म्हणाल्या, की विद्यार्थ्यांच्या हातात दिलेली स्कूल बॅग ही केवळ शालेय वस्तू नसून त्यांच्या स्वप्नांना दिलेली नवी दिशा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर.बी.जी. फाऊंडेशन सातत्याने कार्यरत राहील. कार्यक्रमास अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेंद्र पाटील, सरपंच वाल्याबाई पटांगरे, योगेश दुकळे, येसगावचे सरपंच सुरेश शेलार, मेहुणेचे सरपंच आबासाहेब देवरे, निंबायतीचे सरपंच रतिलाल शेवाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कराळे, बाळासाहेब मिसकर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते. शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नाही, तर सक्षम आणि सुसंस्कृत समाज घडविण्याचा पाया आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलविण्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहील. मधुरा गेठे, अध्यक्षा, आर.बी.जी. फाऊंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs BAN: ऑसी दिग्गजांचा पारा चढला! बांगलादेशविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर पाँटिंगसह माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन संघाला सुनावलं

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

SCROLL FOR NEXT