नाशिक

सीईटी कॅप प्रवेश शिबिर

CD
धुळे टुडे २ साठी... --- धुळे, साक्री, पिंपळनेर येथे सीईटी कॅपसाठी मार्गदर्शन शिबिर धुळे, ता.२६ : बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थी, पालक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी एएसएम नेक्स्टजेन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे केंद्रीकृत प्रवेशप्रक्रियेसंबंधी मार्गदर्शनासाठी धुळे, साक्री व पिंपळनेर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धुळ्यात शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहाला वाडीभोकर रोडवरील पद्मश्री हॉल येथे, रविवारी (ता. २८) सकाळी दहाला साक्रीतील न्यू इंग्लिश स्कूल येथे, तर दुपारी चारला पिंपळनेर येथील आ. मा. पाटील हायस्कूल येथे हे शिबिर होईल, अशी माहिती प्रा. डॉ. केतन देसले व प्रा. डॉ. आरिफ मन्सुरी यांनी दिली आहे. या शिबिरांत अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत मार्गदर्शन केले जाईल. तसेच, ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी, पर्यायी अर्ज, कॅप राऊंड्सचे नियम, फ्रीझ, फ्लोट आणि स्लाइड पर्यायांची माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाईल. याशिवाय चुकीची कॅटेगरी निवड, जातवैधता प्रमाणपत्र, नॉन- क्रिमिलेयर, ईडब्ल्यूएस, उत्पन्न प्रमाणपत्र, ग्रॅप सर्टिफिकेट यांसारख्या प्रवेशप्रक्रियेत लागणाऱ्या सामायिक कागदपत्रांची माहिती, अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आवश्यक सूचनाही दिल्या जातील. विद्यार्थी व पालकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, तळेगाव दाभाडेच्या ४ तरुणांचा मृत्यू; दोघे गंभीर

Gokul Milk Union Election 2026 : राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका; 60 दिवसांत 'गोकुळ'ची निवडणूक घेण्याचे आदेश, 15 ऑक्टोबरपूर्वी होणार मतदान?

Supreme Court: ढाबेवाल्यांसाठी मोठी बातमी! महामार्गालगतचे अनधिकृत ढाबे ६० दिवसांत जमीनदोस्त होणार, सर्वोच्च न्यायालयाने काय दिले आहेत आदेश?

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT