नाशिक

बाईक रॅली

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H22559 धुळे : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी संघर्षशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियानातर्फे काढण्यात आलेल्या बाईक रॅलीत सहभागी नागरिक. --- बाईक रॅलीतून समता, बंधूतेसह शिक्षणाचा संदेश --- राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त संघर्षशक्तीतर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त संघर्षशक्ती एक राष्ट्रशक्ती अभियान यांच्यावतीने शुक्रवारी (ता. २६) सकाळी शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीतून समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या बाईक रॅलीस बसस्थानकाजवळील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. डॉ. कृष्णमोहन सैंदाणे, डॉ. गौतम शिलवंत, महेंद्र निळे, अतुल निकम, माजी सैनिक जिजाबराव पाटील, एम. एच. पाटील, मुस्लिम ओबीसी मंचचे अध्यक्ष अश्पाक शेख, बी. यू, वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी बाईक रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. देवपूर परिसर, धुळे महापालिका, महापालिकेची जुनी इमारत पारोळा रोड आदी प्रमुख मार्गांवरून ही रॅली राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर येथे पोहोचली, तेथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीतील सहभागी नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. या रॅलीद्वारे सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि समाजात एकात्मतेचा संदेश पोहोचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र थोरात, किशोर शेजवळ, चतुर चित्ते, दिलीप गुलाले, नरेंद्र गव्हाणे, रामचंद्र गांगुर्डे, बी. बी. साळवे, सिद्धार्थ जाधव, प्रा. सयाजी शिंदे यांनी रॅलीचे आयोजन केले. चेतन गायकवाड व विजय भामरे यांनी रथाची सजावट केली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT