नाशिक

आठ वर्षात अवघे ३६ हजार पीएनजी जोडणी

CD
टूडे मेन साठी ---------------- नऊ लाख जोडण्यांचे उद्दिष्ट हवेतच आठ वर्षात अवघ्या ३६ हजार ‘पीएनजी’ जोडणी; वांरवार मुदतवाढ विक्रांत मते : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २७ : शहरात घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला दहा वर्षात नऊ लाख जोडणी करण्याचे दिलेले उद्दिष्ट आठ वर्षे होऊन पूर्ण झालेले नाही. त्यात आता युद्धामुळेच वांरवार मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत एक लाख घरांपर्यंत जोडणी पोचली असली तरी दोन लाख ३५ हजारापैकी फक्त ३६ हजार जोडणी स्वयंपाक घरापर्यंत पोचली आहे. घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा (पीएनजी गॅस) करण्याची योजना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीतर्फे अमलात आणली जात आहे. नॅचरल गॅससाठी एमएनजीएल कंपनीने आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टॅन्ड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार स्टेशनसाठी महापालिकेकडून पंधरा वर्षांसाठी जागेचा करार करण्यात आला आहे. २०१८ मध्ये ‘एमएनजीएल’ तर्फे पीएनजी गॅस लाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील दहा वर्षात नऊ लाख कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात घरगुती गॅस पुरवठ्याच्या जोडणीचे उद्दिष्ट दोन लाख ३५ हजार निश्‍चित करण्यात आले. परंतु कामांना विलंब होत असल्याने आठ वर्षात फक्त ३६ हजार पीएनजी जोडणी देण्यात आली आहे. २०२५ मध्ये २० हजार जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यापैकी १४ हजार जोडण्यांचा त्यात समावेश आहे. सद्यःस्थितीत प्रत्यक्षात ३६ हजार घरांमध्ये पीएनजी म्हणजेच स्वयंपाकाचा गॅस पोचला आहे. एक लाख घरांपर्यंत पाइपलाइन पोचली आहे. ------------------- जोडणीसाठी मिळेना प्लंबर अमेरिका- इराण युद्धामुळेच सातत्याने उद्दिष्टात बदल केले. मागील वर्षी दिवाळीच्या कालावधीतील तीन महिन्यात ५० हजार जोडणीचे उद्दिष्ट दिले होते, ते पूर्ण होवू शकले नाही. १ एप्रिल २०२६ मध्ये जूनपर्यंत दररोज ३०० जोडणीचे उद्दिष्ट दिले गेले. त्यानंतर मे २०२६ मध्ये ६०० जोडणीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. वांरवार उद्दिष्ट बदलले खरे, परंतु प्लंबर मिळत नसल्याने जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. सध्या दररोज सरासरी १५० जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण होत आहे. मुख्यत्वे पश्‍चिम बंगाल व उत्तर प्रदेशातील प्लंबरमार्फत जोडणीचे काम होते, परंतु त्या भागातील प्लंबर उपलब्ध होत नसल्याने तुटवड्यामुळे जोडणी करण्यास विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी दररोज सरासरी दीड किलोमीटरची खोदाई होत आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘एमएनजीएल’च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने माहिती चुप्पी साधली आहे. ---------------------- घरगुती पीएनजी जोडणीची स्थिती - एकूण घरगुती जोडणी उद्दिष्ट : २,३५,००० - जोडणी झालेली घरे : ३६,००० - स्टील पाइपलाइन : १८० किलोमीटर. - प्लॅस्टिक पाइपलाइनचे पूर्ण झालेले काम : ६०० किलोमीटर. ---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT