पान-३ मेन करणे---- मंदिराचा
फोटो वापरणे
------------
देवस्थानच्या निधीतून त्र्यंबकची स्वच्छता
------------
नगरपालिकेला तेरा कोटी रूपये देण्याचा ठराव मंजूर
------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२६ : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला देणगीच्या स्वरूपात भाविकांकडून प्राप्त झालेले दान शहराची स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी उपयोगात येणार आहे. त्यासाठी देवस्थान ट्रस्टने साधारणतः १३ कोटी रुपये त्र्यंबक नगरपालिकेला देण्याची तयारी दर्शविल्याने या संदर्भातील ठराव पारित झाला आहे.
त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक माहात्म्यामुळे हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. शहराची लोकसंख्या १५ हजार असली तरी दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या १५ ते २५ हजारांदरम्यान आहे. त्यामुळे शहरात दररोज सुमारे अडीच ते पाच टन कचरा संकलित होतो. श्रावण महिना, पितृपक्ष आणि संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवादरम्यान हा आकडा १० ते १२ टनापर्यंत पोहोचतो. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पालिकेसमोर गंभीर स्वरूपाचा बनला आहे. यावर उपाय म्हणून नगरपालिकेने शहरापासून १२ किलोमीटरवरील तळेगाव शिवारात अडीच एकर जागा निश्चित केली आहे. या जागेवर घनकचरा व्यवस्थापन केले जात आहे. त्यासाठी नगरपालिकेला ८ कोटींपर्यंत निधी अपेक्षित आहे. आगामी कुंभमेळाकाळात लाखो भाविक येथे येणार असल्यामुळे कचरा संकलनाचा प्रश्न अधिक गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. त्यादृष्टीने नगरपालिकेने नियोजन केले असून नियमित कचरा संकलनासह शहराची स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतची प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी नगरपालिकेने १३ कोटींची मागणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडे केली आहे. देवस्थानला प्राप्त होणाऱ्या देणग्यांवर कर आकारला जातो. या करापोटी ट्रस्टला कोट्यवधी रुपयांचा भरणा करावा लागेल. त्याऐवजी हा निधी विनियोगात आणण्याचा विचार आहे.
…
२०-२
कचऱ्याचे ढिगारे कायम
त्र्यंबकेश्वर शहरातील कचरा नाशिक महापालिकेने स्वीकारल्यापासून नियमितपणे हा कचरा नाशिकला येत आहे. शहरातील विल्होळी येथील डेपोत त्याचे वर्गीकरण केले जात असल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या कचऱ्याचा प्रश्न निकाली निघाल्यात जमा आहे. मात्र, तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस यापूर्वी तयार झालेले ढिगारे अद्याप हटविण्यात न आल्यामुळे त्याचा स्थानिकांना त्रास होतो.
-----------
कोट
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला येतील. त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. देवस्थान ट्रस्टने त्यासाठी पुढाकार घेतल्याचा आनंद आहे. त्यांनी निधी द्यावा, यादृष्टीने ठराव केला.
- त्रिवेणी तुंगार, नगराध्यक्ष, त्र्यंबक नगरपालिका.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.