नाशिक

पारोळा येथे आरती महोत्सव साजरा

CD
NSK26H22567 (सिंगल कॉलम) पारोळा ः श्री जनार्दन मंदिरात समापन आरती करताना नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाविक. पारोळा येथे आरती महोत्सव साजरा जनार्दन मंदिरात नगराध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केली समापन आरती सकाळ वृत्तसेवा पारोळा, ता. २६ ः येथील सुमारे साडेपाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री जनार्दन मंदिरात अधिक मासानिमित्त काकड आरती महोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते समापन महोत्सव आरती करण्यात आली. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषोत्तम काकड आरती, आरती महोत्सवासह भावगीतांचा कार्यक्रम पार पडला. महोत्सवात भजनी मंडळाचे गायन, नित्य बालभोग सेवा, आंबा महोत्सव, आईची गोड गाणी पुस्तिकेचे वितरण, ५६ भोग, गायत्री परिवाराचा दीपोत्सव असे विविध कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरे झाले. समाप्ती काकड आरती उपनगराध्यक्ष ॲड. रोहन मोरे व जिल्हा दूध संघाचे संचालक पराग मोरे यांच्याहस्ते सहपत्नीक करण्यात आली. यावेळी विश्वस्त शाम देवळे, जगदीश शर्मा, प्रशांत वाणी, कैलास चौधरी, मंदिराचे व्यवस्थापक विश्वास कोळी, सुदर्शन कोळी, प्रा. सुनील कोळी, प्रेमनाथ कायस्थ आदी उपस्थित होते. महोत्सवात श्री जनार्दन मंदिरात शहरातील महिला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिर विश्वस्तांचे या उपक्रमाबाबत कौतुक करून पुरुषोत्तम मासांत राबविलेले उपक्रम फलदायी असल्याची भावना व्यक्त केली. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Lohagad murder case: लोहगडावर मे महिन्यापासून ‘रेकी’, कॉल-मेसेज डिलीट करून पुरावे नष्ट; केतन अग्रवाल खून प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

SCROLL FOR NEXT