नाशिक

''क्रेडिट'' सुविधेने पंपांना सुरळित इंधन पुरवठा

CD
‘क्रेडिट’ने पेट्रोलपंपांना सुरळीत इंधनपुरवठा शहरात मुबलक साठा; डिझेल वितरणातील निर्बंध कायम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ : दीड-दोन महिन्‍यांत इंधन टंचाईच्‍या झळा सोसाव्‍या लागत असताना, सध्या परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. इंधन कंपन्‍यांनी अंशतः ‘क्रेडिट’ सुविधा उपलब्‍ध केल्‍याने इंधन पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे. यापूर्वी घातलेल्‍या निर्बंधांनुसार डिझेलची मर्यादित प्रमाणात विक्री होत आहे. दरम्‍यान, शहरात मुबलक इंधनसाठा उपलब्‍ध असल्‍याचे पंपचालकांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्‍तरावर निर्माण झालेल्‍या तणावपूर्ण वातावरणामुळे इंधनपुरवठा प्रभावित झाला होता. त्‍या समाज माध्यमांवर अफवा पसरविल्‍या जात असताना भीती निर्माण झाल्‍याने पंपांबाहेर रांगा लागल्या होत्‍या. पुरवठा कमी झालेला असताना, मागणीमध्ये अचानक वाढ झाल्‍याने इंधनटंचाई निर्माण झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर उसळी घेत असल्‍याने ऑइल कंपन्‍यांनी आपल्या धोरणात बदल करत पंपचालकांना क्रेडिटमध्ये माल विक्री बंद केली होती. त्‍यामुळे पंपचालकांना माल खरेदी करताना आगाऊ पैसे भरावे लागत होते. क्रेडिट योजना पुन्‍हा लागू करावी, अशी मागणी पंपचालकांकडून केली जात होती. या संघर्षाच्‍या वातावरणामुळे डेपोतून इंधन उपलब्‍ध करून देण्यापूर्वी पंपचालकांना मालाची रक्‍कम आगाऊ जमा करावी लागत होती. मात्र आता इंधन कंपन्‍यांनी पंपचालकांना किमान माल खरेदी केलेल्‍या दिवशी सायंकाळपर्यंत रक्‍कम अदा करण्याची मुभा दिली आहे. यामुळे माल डेपोत किंवा वाहतुकीत न अडकता थेट पंपांपर्यंत पोचू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT