NSK26H22570
जळगाव : आग लागून जळालेली गादी.
इस्त्री सुरू राहिल्याने गादीला आग;
साहित्या टॉवरमध्ये धुरामुळे घबराट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२६ : घरातील इस्त्रीचे बटन सुरूच राहिल्याने ती अतिउष्ण होऊन गादीने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) मोहाडी रस्त्यावरील साहित्या टॉवर येथे घडली. या घटनेमुळे घरातून धूर बाहेर येऊ लागल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली.
प्रकाश साहित्या यांच्या घरात ही घटना घडली. इस्त्री सुरूच राहिल्याने ती अधिक तापली आणि तिच्या संपर्कात आलेल्या गादीला आग लागली. घरातून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग मोठी नसल्याने घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत अग्निशमन दल येण्यापूर्वीच आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, किरकोळ नुकसान झाले. वेळेत आग विझविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.