फोटो: 22578
नाशिक ः महावितरणचे नवनियुक्त संचालक धनंजय औंढेकर यांचा सत्कार करताना आशिष नहार, संजय महाजन, सचिन शहा, अमित कुलकर्णी, रवींद्र झोपे, लघु मनीष रावल, राजेंद्र वडनेरे.
...
उद्योगांना मोफत नवीन वीज जोडणी
धनंजय औंढेकर : निमा व औद्योगिक संघटनांकडून सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२६ : महाराष्ट्रात नवीन वीज जोडण्यांसाठी चार हजार कोटींची तरतूद केल्यामुळे उद्योगांसाठी नवीन वीज जोडणीचा खर्च महावितरणमार्फत केला जाणार असल्याची ग्वाही महावितरणचे नवनियुक्त संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिली.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा), आयमा, महाराष्ट्र चेंबर, लघुउद्योग भारती, मास्मा आदी संघटनांनी एकत्रितपणे त्यांचा सत्कार केला, त्याला उत्तर देताना महावितरणचे औंढेकर बोलत होते.
निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात उद्योजकांचे विविध प्रश्न मांडले. महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता अनिल थोरात, आयमा सरचिटणीस संजय महाजन, महाराष्ट्र चेंबरचे सचिन शहा, मास्माचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, आयमा ऊर्जा समिती अध्यक्ष रवींद्र झोपे, लघु उद्योग भारती व इकॉमचे रावसाहेब रकिबे, मनीष रावल, राजेंद्र वडनेरे, प्रवीण वाबळे, कैलास पाटील, सतीश कोठारी, दीपाली चांडक, महेंद्र बच्छाव, नाना देवरे, नितीन आव्हाड आदी उपस्थित होते.
श्री. औंढेकर म्हणाले, वीज निरंतर योजनेंतर्गत आगामी कुंभमेळ्यापूर्वी नाशिक जिल्ह्यात ७ हजार नवीन वितरण रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर्स) बसविण्यात येतील. २० वर्षांहून अधिक जुनी रोहित्रे टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत. राज्यातील सध्याचा २७ हजार मेगावॉटचा पीक वीजभार पुढील तीन वर्षांत १६ हजार मेगावॉटपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निमा ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.
…
१६-१
मोबाईल एमएसईबी पथके
वीजचोरी रोखण्यासाठी मोबाईल एमएसईबी पथके नियुक्त केले जाणर आहेत. महावितरणच्या सर्व सेवा पूर्णपणे ऑनलाइन झाल्या आहेत. ग्राहकांची वीजबिले मुख्यालयातून २४ तासांच्या आत तयार होऊन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापर, गळती, अनियमित वापर आणि इतर महत्त्वाच्या बाबींची माहिती ग्राहकांना थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.