धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H22579
धुळे : जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक व क्रीडा महासंघाच्या सभेला उपस्थित महासंघाचे पदाधिकारी.
---
स्पर्धास्थळी पाणी, चेंजिंग रुमची व्यवस्था व्हावी
---
धुळे जिल्हा क्रीडा महासंघाची मागणी; धुळ्यात महासंघाची सभा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था करावी, क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी वॉशरुम स्वच्छ असावेत, स्पर्धेदरम्यान विशेषतः खेळाडू मुलींसाठी चेंजिंग रुमची व्यवस्था करावी यासह विविध मागण्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मांडण्याचा निर्णय धुळे जिल्हा शारिरीक शिक्षण शिक्षक व क्रीडा महासंघाच्या सभेत घेण्यात आला.
---
महासंघाची सभा शुक्रवारी (ता.२६) शहरातील जे. आर. सिटी हायस्कूल येथे झाली. या सभेला धुळे क्रीडा महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पवार, जिल्हा कार्यकारिणी कार्याध्यक्ष आर. बी. शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, उपाध्यक्ष विजय दहिते, सहसचिव राधेश्याम पाटील, सहसचिव सतीश पाटील, जिल्हा संघटक संजय पाटील, विलास पाटील, महेंद्र जमादले, दिनेश पवार, प्रसाद कोळपकर यांच्यासह १६ पदाधिकारी उपस्थित होते.
या विषयांवर चर्चा
सभेत खेळाडू व स्पर्धा या विषयांवर चर्चा झाली. यात जिल्हास्तरावर एकाच दिवशी दोन खेळांच्यावर स्पर्धा घेऊ नये, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या दिवशी पाण्याची व्यवस्था नसते ती मुबलक व प्राधान्याने व्हावी, स्पर्धेच्या दिवशी वॉशरूम स्वच्छ असावेत, स्पर्धेवेळी खेळाडूंसाठी विशेषतः मुलींसाठी चेंजिंग रूमची व्यवस्था होत नाही हा मुद्दा अग्रभागी ठेवून हा प्रश्न सर्वात आधी मार्गी लावावा, तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा खर्च, त्रुटी तत्काळ काढून अदा करण्यात यावा, पंचांना मानधन देण्यात यावे, सुट्टीच्या दिवशी कोणत्याही स्पर्धा घेण्यात येऊ नयेत, १५ जानेवारीपर्यंत सर्व जिल्हा क्रीडा स्पर्धांचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत, जिल्हास्तर (ग्रामीण) स्पर्धेला उर्वरित हा शब्द काढून जिल्हास्तर स्पर्धा असे म्हणावे यासह इतर विषय मागण्यांवर सभेत चर्चा झाली. हे सर्व विषय व मागण्या धुळे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मांडण्याचे तसे लेखी निवेदन देण्याचे ठरले. धुळे क्रीडा महासंघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष डॉ. आनंद पवार यांनी मार्गदर्शन केले. महासभेत संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. बी. शिंदे यांनी निवृत्तीमुळे कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खेळाडू व शिक्षकांच्या कोणत्याही कामात मदतीसाठी व सेवेसाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली. महासंघाचे जिल्हा सचिव डॉ. भूपेंद्र मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव उमेश देसले यांनी आभार मानले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.