NSK26H22582
पुणे : मान्यवरांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ स्वीकारताना प्रा. डॉ. वर्षा पाठक.
-------
आदर्श शिक्षक पुरस्काराने
डॉ. वर्षा पाठकांचा गौरव
जळगाव, ता. २६ : अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या प्राचार्या प्रा. डॉ. वर्षा मकरंद पाठक यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ पुणे येथील सिंबायोसिस संस्थेत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
शिक्षण, संशोधन, नवोपक्रम व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ग्लोबल इलाईट मिडीया ॲण्ड टेक संस्थेतर्फे हा गौरव झाला. संगणक विज्ञान क्षेत्रातील ३७ वर्षांच्या सेवेत डॉ. पाठक यांनी अध्यापन, संशोधन, अभ्यासक्रम विकास, विद्यार्थी मार्गदर्शन, कृत्रिम बुद्धिमत्ता व आधुनिक तंत्रज्ञानविषयक उपक्रमांद्वारे विशेष योगदान दिले. प्राचार्यपदापूर्वी त्यांनी जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालय, जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, के.सी.ई.एस. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे प्राध्यापक, विभागप्रमुख व डीन (स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स) अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.