नाशिक

नयना पाटील पुरस्कार

CD
धुळे ः टुडे ३ साठी, ॲंकर -- फोटो क्रमांक ः 22583 पाचगणी : सोहळ्यात संजय आवटे यांच्याकडून ग्रामरत्न पुरस्कार स्विकारताना सरपंच नयना पाटील. शेजारी डॉ. संदीप पाटील, जयंत पाटील आदी. -- नयना पाटील यांचा ग्रामरत्न पुरस्काराने सन्मान -- मांडळमधील कार्यकर्तृत्वाची अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे दखल - किंवा - नयना पाटील यांचा ग्रामरत्न पुरस्कार प्रदान -- मांडळमधील कार्यकर्तृत्वाची अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे दखल - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे मांडळ (ता. धुळे) येथील लोकनियुक्त सरपंच नयना पाटील यांना या वर्षीचा मानाचा महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचगणी (जि. सातारा) येथील सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. सरपंच नयना पाटील यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. - ग्रामविकासात नयना पाटील यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मांडळ येथे त्यांनी २०१२ ते २०१७ या काळात उपसरपंच म्हणून काम पाहिले. नंतर २०१७ ते २०२२ या कालावधीत त्या पहिल्यांदा लोकनियुक्त सरपंच झाल्या. त्यांच्या कामावरील विश्वासामुळे २०२२ ते २०२७ या सलग दुसऱ्या टर्मसाठी त्यांची मांडळच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. सध्या त्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका, तसेच भाजप महिला मोर्चाच्या धुळे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्ते पती डॉ. संदीप पाटील, सासरे प्रा. छबू पाटील यांची साथ लाभत आहे. - मांडळचा नावलौकिक सरपंच नयना पाटील यांच्या नेतृत्वात मांडळने विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. यात पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत धुळे तालुक्यातून प्रथम, तर आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेत धुळे तालुक्यातूनही मांडळला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे. तंटामुक्त गाव आणि उत्कृष्ट जलसंधारण गाव म्हणूनही मांडळला गौरविण्यात आले आहे. सोहळ्यास माजी सनदी अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, ग्रामविकास अभ्यासक शरद बुट्टे-पाटील, सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील व पदाधिकारी प्रमुख पाहुणे होते. राज्यभरातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. यात ग्रामपंचायतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर मंथन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT