नाशिक

८ चार्जिंग स्टेशन्स सज्ज

CD
धुळे ः टुडे ३ साठी, मेन -- लोगो छायाचित्र क्रमांक ः 22584 -- धुळे आगारात ८ चार्जिंग स्टेशन्स सज्ज - शिवाई ई- बससेवेला गती; जागा निवडीचा तिढा सुटल्याने क्षमतावाढ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : धुळे आगारातील शिवाई ई- बससेवेला आता अधिक बळ मिळणार आहे. आगारात उभारण्यात आलेली ८ अत्याधुनिक हाय-स्पीड चार्जिंग स्टेशन्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाली आहेत. यामुळे धुळे- नाशिक, धुळे- छत्रपती संभाजीनगर आणि धुळे- जळगाव मार्गांवरील बसफेऱ्या वाढण्यास मदत होणार असून, प्रवाशांना अधिक नियमित, आरामदायी आणि वेळेवर सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. - धुळे आगारातील चार्जिंग सुविधेचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील हाय-स्पीड यंत्रणा. या सुविधेमुळे एक शिवाई बस अवघ्या दोन तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. परिणामी, बसेस दीर्घकाळ थांबून न राहता कमी वेळेत पुन्हा मार्गावर धावण्यासाठी सज्ज होतील. यामुळे आगाराच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन बससेवेतील सातत्य राखणे शक्य होणार आहे. - तिढा अखेर सुटला धुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्विकासाचा आणि मोठ्या शहरांच्या धर्तीवर ‘बसपोर्ट’ उभारण्याचा आराखडा अनेक वर्षांपासून विचाराधीन आहे. भविष्यातील पुनर्विकास लक्षात घेऊन चार्जिंग स्टेशनसाठी योग्य जागा निश्चित करणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते. चुकीच्या जागी बांधकाम झाल्यास पुढे तोडफोड करण्याची वेळ आली असती. या तांत्रिक अडचणींमुळे चार्जिंग स्टेशन उभारणीसह ‘शिवाई’च्या आगमनाला विलंब झाला. मात्र, आता हा जागा निवडीचा तिढा सुटल्याने काम पूर्ण झाले असून, नवीन बसेसही सेवेत दाखल झाल्या आहेत. - ३५० किमीचा प्रवास शिवाई ई-बस एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर सुमारे ३०० ते ३५० किलोमीटरचा टप्पा पार करू शकते. त्यामुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर एकाच चार्जिंगमध्ये विनाखंड प्रवास पूर्ण करणे शक्य होत आहे. यामुळे इंधनावरील खर्च कमी होऊन वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल. एसटी महामंडळाला अनेकदा डिझेल टंचाईचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत ई- बस ताफ्यातील वाढ आणि स्वतःची हक्काची चार्जिंग सुविधा उपलब्ध झाल्याने आगार प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. पर्यायी ऊर्जेवर आधारित या वाहतुकीमुळे महामंडळाचा खर्च नियंत्रणात राहण्यास आणि सेवेची नियमितता राखण्यास मदत होत आहे. - प्रवाशांचा वाढता प्रतिसाद वातानुकूलित सुविधा, आरामदायी आसनव्यवस्था आणि ध्वनीमुक्त (शांत) प्रवास यामुळे ‘शिवाई’ला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या बसेससाठी खासगी कंत्राटी चालक नियुक्त करण्यात आले असून, तिकीट वितरणाची जबाबदारी महामंडळाचे अधिकृत वाहक सांभाळत आहेत. साध्या बसच्या तुलनेत तिकीट दर काहीसे अधिक असले, तरी पर्यावरणपूरक व दर्जेदार प्रवासामुळे प्रवासी या सेवेला पसंती देत आहेत. - १४-१ ...चौकट... १४-१ हरित वाहतुकीकडे खंबीर पाऊल राज्य परिवहन महामंडळाकडून सध्या पर्यावरणपूरक वाहतुकीवर विशेष भर दिला जात आहे. धुळे आगारातील या नव्या सुविधेमुळे ई-बस संचालनाला मोठी चालना मिळणार असून, भविष्यात आणखी बसेस ताफ्यात दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एकूणच, धुळे आगार आता ‘हरित’ आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update: आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल या प्रकरणातील चौकशीनंतर पोलीस ठाण्यातून निघून गेला

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT