नाशिक

वादळात नुकसानीचे आकडे कमी

CD
वादळात नुकसानीचे आकडे कमी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : खानदेशात वादळाने मे व जून महिन्यात धुमाकूळ घातला. त्यात केळी, भाजीपाला पिके, गोठे, पॉलिहाऊस, शेडनेट व इतर कृषीसंबंधी बाबींची हानी झाली. पण २० ते २५ टक्केच नुकसान झाल्याचे आकडे अनेक शेतकऱ्यांबाबत प्रशासनाने तयार केले. कमी म्हणजेच ३० टक्क्यांखाली नुकसान झाल्याचे सांगून संबंधित शेतकरी, कृषी उद्योजकांना भरपाई मिळत नसल्याची स्थिती आहे. धुळ्यातील साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, जळगावमधील जळगाव, भुसावळ, जामनेर भागात पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान झाले आहे. तसेच रावेर, नंदुरबारमधील शहादा भागात केळीची पडझड वादळी पावसात झाली. केळीसंबंधी विमाधारक शेतकरी जाकच निकषांमुळे वादळासंबंधीच्या भरपाईसह उष्ण वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीस पात्र ठरणार नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे प्रशासनाकडून भरपाई मिळणे अपेक्षित आहे. यात पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान, टक्केवारी कशी ग्राह्य धरावी, याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिलेल्या नाहीत. तसेच अनेक भागात केळीचे २० ते २५ टक्के नुकसान झाल्याने संबंधितांना भरपाई मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हा सावळा गोंधळ प्रशासन गेले अनेक वर्षे घालत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रावेरात केळी, भाजीपाला पिकांचे सुमारे पाच हजार हेक्टरवर, चोपड्यात सुमारे दीड हजार हेक्टरमध्ये आणि धुळ्यात १२०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. पण २० ते २५ टक्के नुकसान, त्याचे आकडे भरपाईच्या अहवालात समाविष्ट केल्यास ही नुकसानीची आकडेवारी १८ ते १२ हजार हेक्टरवर केळीसंबंधी जाईल, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT