नाशिक

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियमचे संघ विवेकरत्न प्रश्नमंजुषा स्पर्धेत उपविजेते

CD
NSK26H27931 जळगाव : उपविजेत्‍या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलचे संघासमवेत शिक्षक. ––– विवेकानंद स्कूलचा संघ प्रश्नमंजूषा स्पर्धेत उपविजेता सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित आंतर शालेय विवेकरत्न सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा स्पर्धेत प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन्ही संघ उपविजेते ठरले. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा त्यानंतर तोंडी परीक्षेद्वारे दोन गटातील स्पर्धेसाठी शाळेच्या दोन संघांची निवड करण्यात आली. शानबाग विद्यालय येथे अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शानबाग विद्यालय, पलोड पब्लिक स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, विवेकानंद प्रतिष्ठान सेमी इंग्लिश स्कूल या चार शाळांचे पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट असे आठ संघ अंतिम फेरीत सहभागी झाले होते. उपविजेत्या संघात लहान गटात अनय डोहोळे, युग मोरे, वेदिका खैरनार, मानसी माळी, श्रावणी नवलखे या विद्यार्थ्यांचा तर मोठ्या गटात जिज्ञासा पाटील, दीपिका आहेर, आदित्य पाटील, प्रतीक्षा लोखंडे, दर्शन सोनवणे यांचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य संतोष चौधरी आणि नीलेश चौधरी व भूषण लोहार यांचे मार्गदर्शन लाभले. उपविजेत्या संघातील विद्यार्थी, प्राचार्य व शिक्षकांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, उपाध्यक्ष हेमा अमळकर, सचिव विनोद पाटील यांनी अभिनंदन केले आहे. –––––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT