नांद्रा ग्रामसमृद्धी : वैष्णवी मावा पेढा लेख (फोटो वॉट्स ॲपवर टाकले आहे)
नांद्रा येथील वैष्णवी मावा
पेढ्याची चवच न्यारी..!
पद्मालयच्या पवित्र भूमीची ‘गोड’ ओळख
लीड...
व्यवसाय म्हटला की त्याची ओळख एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे निर्माण होते. एरंडोल तालुक्यातील पद्मालय हे श्री गणेशाचे प्रसिद्ध शक्तीपीठ असल्याने येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. या पवित्र भूमीशी जोडली गेलेली आणखी एक खास ओळख म्हणजे ताडे गावचा प्रसिद्ध मावा पेढा. आपल्या आगळ्या चवीमुळे आणि दर्जामुळे हा पेढा भाविकांच्या पसंतीस उतरून परिसरात विशेष प्रसिद्ध झाला आहे. आता याच ताडे मावा पेढ्याची अस्सल चव नांद्रा येथील सोपान पाटील यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली असून, त्यांच्या व्यवसायामुळे या पारंपरिक गोडव्याला नवी बाजारपेठ मिळाली आहे.
----
ताडेच्या पेढ्यांची परंपरा
सुमारे ५० वर्षांपूर्वी ताडे येथील सोपान पुंडलिक पाटील यांनी पद्मालय परिसरात पेढ्यांचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू गावातील इतर सहकारीही या व्यवसायात उतरले आणि विविध शहरांसह गाव-खेड्यांत ताडे गावचा मावा पेढा विकू लागले. याच प्रसिद्ध पेढ्यांची परंपरा पुढे नेत राजेंद्र दौलत पाटील यांनी २०१९ मध्ये नांद्रा येथे ‘वैष्णवी मावा पेढे’ सुरू केले.
रोजगाराची वाटचाल
राजेंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नी सुनीता राजेंद्र पाटील यांनी स्वतःला या व्यवसायात झोकून दिले आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी चार जणांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी एक जण दूध आटवण्याचे काम करतो, तर दुसरा दुकानाची जबाबदारी सांभाळतो.
यशाचे गमक
नांद्रा हे त्यांचे पाहुण्यांचे गाव असून, माणसे जोडण्याची कला, ग्राहकांशी जपलेले आपुलकीचे संबंध आणि पेढ्यांच्या गुणवत्तेत कधीही तडजोड न करणे, हे त्यांच्या यशाचे गमक आहे. ताडे गावच्या पेढ्यांबरोबरच ते स्वतः तूप व पनीरही तयार करतात. व्यवसायाला पूरक म्हणून कोल्ड्रिंक्सचाही व्यवसाय करतात.
पेढ्यांची वाढती मागणी
मामांच्या वैष्णवी मावा पेढ्याला इतकी प्रचंड मागणी आहे की, दररोज तब्बल ३० ते ३५ किलो पेढ्यांची विक्री होते. सण-उत्सवाच्या काळात तर मागणी इतकी वाढते की, अनेक बाहेरगावचे ग्राहक पेढ्यांच्या ऑर्डर देतात. एवढी या पेढ्यांची लज्जत न्यारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.