(पान १ ला ॲंकर)
फोटो : NSK26H28170
नंदुरबार : खेळांच्या फॅशन शोमध्ये सहभागी विद्यार्थी.
----------------------
सरावातून मेजर ध्यानचंदांसारखे खेळाडू तयार होतील
महेश पाटील : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंचे ‘फॅशन शो’
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १ : विद्यार्थ्यांनी सतत मेहनत आणि सराव केला तर मेजर ध्यानचंद यांच्यासारखे महान खेळाडू तयार होतील. खेळातील उत्तम कामगिरीमुळे खेळाडूचे नाव कायम प्रत्येकाच्या लक्षात राहते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी केले.
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा उपक्रम राबविण्यात आले. यादरम्यान हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, लांब उडी, वेटलिफ्टिंग, दोरीउडी आणि बास्केटबॉल या खेळांचे साहित्यासह खेळाडूंचे ‘फॅशन शो’ आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य नूतनवर्षा वळवी होत्या. उपप्राचार्य विजय पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा आणि पर्यवेक्षक मिनल वळवी यांची उपस्थिती होती. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. खुशाल शर्मा यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांचा सत्कार प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी केला. पर्यवेक्षक मिनल वळवी, उपप्राचार्य विजय पवार, सतीश सदाराव, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, शारदा पाटील, खुशाला शर्मा कार्यक्रमास उपस्थित होते. चारही क्रीडा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, लांब उडी, वेटलिफ्टिंग, दोरीउडी आणि बास्केटबॉल या खेळांच्या साहित्यासह खेळाडूंचे ‘फॅशन शो’ चे आयोजन करण्यात आले. म्युझिकल आट्यापाट्या खेळात विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक क्षमता दाखवत उत्कृष्ट कामगिरी दाखवली. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये रंगलेली ‘टग ऑफ वॉर’ स्पर्धा रोमांचक ठरली. खुशाल शर्मा व शारदा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य विजय पवार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.