नाशिक

नांद्रा ग्रामसमृद्धी : आप्पासाहेब पी. एस. पाटील विद्यालय

CD
नांद्रा ग्रामसमृद्धी : आप्पासाहेब पी. एस. पाटील विद्यालय शाळेचे फोटो NSK26H28233 NSK26H28236 ---- शीर्षक दर्जेदार शिक्षणाचा नांद्रा ‘पॅटर्न’ उपशीर्षक आप्पासाहेब पी. एस. पाटील विद्यालयाचा लौकिक लीड... आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षणाच्या माध्यमातून ‘शेंदुर्णी एज्युकेशन’च्या या शाळेने पाचोरा तालुक्यात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. --- ऐतिहासिक वाटचाल आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांनी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटीतर्फे १९६३ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल नांद्रा या नावाने आठवी, नववीचे २ वर्ग सुरू केले. (कै.) तुकाराम जयराम तावडे यांच्या सहकार्याने शाळा जीनिंगमध्ये भरविण्यात आली. पहिल्या वर्षी ५२ विद्यार्थी दाखल झाले. पहिले मुख्याध्यापक (कै.) पी. जे. तावडे होते. १९७६ मध्ये (कै.) डब्ल्यू. एस. पाटील यांनी शाळेची धुरा सांभाळून नवीन इमारत उभी केली. संस्थेमार्फत यशवंतराव चव्हाण दलित छात्रालयही सुरू झाले. २ जुलै २०११ रोजी संस्थाप्रमुख संजय गरुड यांनी शाळेचे आप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय असे नामकरण केले. संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, उपाध्यक्ष भीमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यू. यू. पाटील, कार्यालयीन सचिव दीपक गरुड व सर्व संचालक मंडळ यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते. आजची स्थिती सध्या नांद्रा, पहाण, हडसन, आसनखेडा, कुरंगी, माहेजी, वरसाडे, लासगाव येथील ६२५ विद्यार्थी‌ या शाळेत शिक्षण घेत आहेत. यात २९५ विद्यार्थी खेड्यावरून ये-जा करतात. पंचक्रोशीतील सर्वाधिक विद्यार्थी संख्या आणि दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून या विद्यालयाचा लौकिक आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम अभ्यास : दहावीसाठी वर्षभर सर्व विषयांचे जादा तास. पाचवी ते आठवीसाठी स्कॉलरशीप, नवोदय, महात्मा गांधी जीवन परीक्षा, एकलव्य स्पर्धा परीक्षा, इस्कॉन भगवत गीता ज्ञान परीक्षा, लेखन-वाचन वर्ग. कला-क्रीडा : शासकीय चित्रकला परीक्षा, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग. सोयी : सीसीटीव्ही, प्रोजेक्टर, ५० इंची टीव्ही, अद्यावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा. माध्यम : पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसाठी आचारसंहिता तयार केली असून, शाळेत मोबाईल बंदचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. विद्यार्थीप्रिय गुरुजनांची परंपरा विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापकांची परंपरा या विद्यालयातील तत्कालीन मुख्याध्यापक आर.एस. चौधरी व एस. के. पाटील यांची विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापकांची परंपरा श्री. एस. एस. गुजर यांनी कायमस्वरूपी ठेवत विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. मुख्याध्यापकांच्या टेबलावर ड्रेसिंग बॉक्स व प्रथमोपचाराचे साहित्य असते. खेळताना लागल्यास, सर्दी-ताप-पोटदुखी झाल्यास ते स्वतः ड्रेसिंग करून औषधी देतात. विद्यार्थी मेळावे या शाळेतील माजी विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत तर असंख्य विद्यार्थी आज तिन्ही सैन्य दलात देशाच्या विविध भागांमध्ये देशसेवा करीत आहेत. माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित करण्यात येतात. येथील यशवंतराव चव्हाण दलित वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी लोक सहभागातून ‘सकाळ-एनआई’चे अंक उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मंबई महापालिकेचे स्थापत्य अभियंता राजेश राठोड यांनी तर या वर्षी वसई येथील ग्रामविकास अधिकारी रमाकांत चव्हाण यांनी यासाठी सहकार्य केले. चौकट गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेचे दहावीच्या परीक्षेचे केंद्र सामनेर या शाळेवर आहे. सामनेर केंद्रात नांद्रा येथील विद्यार्थी प्रथम येण्याचा बहुमान सातत्याने पाच ते सहा वर्षांपासून मिळवत आहेत. शाळेचा दहावीचा निकाल ९० टक्के लागतो. शाळेला भव्य अशी आधुनिक व्यायामशाळा आहे. स्वतंत्र ग्रंथालय, प्रयोगशाळा तसेच आधुनिक शिक्षणासाठी इंटरनेटचा वापर आणि स्वतंत्र प्रोजेक्टरची सुविधा आहे. सर्व वर्गांमध्ये चांगले व दर्जेदार अध्यापन होण्यासाठी नियमानुसार शिक्षकवृंद उपलब्ध आहेत. शालेय परिसर स्वच्छ राहण्यासाठी सातत्याने उपाययोजना राबविण्यात येतात. यासाठी गावातील नागरिक व पालक सतत मदत करत असतात. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT