शहर आणि जिल्हा पान-१ मेन फिचर
(सकाळ विशेष/सिंहस्थाचा लोगो वापरावा)
.....
त्र्यंबक परिसरात ३१ ठिकाणी तात्पुरती रुग्णालये
----------
सिंहस्थ कुंभमेळा ः चार महिन्यांच्या काळात कोट्यवधी भाविकांसाठी मिळणार ‘आरोग्य कवच’
.....
नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून येणाऱ्या कोट्यवधी भाविक आणि साधू-महंतांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाने मायक्रो-लेव्हल नियोजन पूर्ण केले आहे. गर्दीच्या वेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन कुंभमेळ्याच्या चार महिन्यांच्या मुख्य कालावधीत त्र्यंबकेश्वर परिसरातील ३१ अतिसंवेदनशील ठिकाणी प्रत्येकी ३ खाटांची तात्पुरती रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.
--------------
कुंभमेळा वर्षभरावर येऊन ठेपला आहे. पर्वणी दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यापूर्वी जिल्हा, पोलिस व आरोग्य विभागाकडून सुक्ष्मनियोजन करण्यात आले आहे. आरोग्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांसह साधु-महंतांची संख्या लक्षणीय असेल. पर्वणीदरम्यान पावसाची शक्यता अधिक असल्याने आरोग्याच्या समस्या उदभवू शकते. गर्दीमुळे काही भाविकांनाही आरोग्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी भाविकांना तात्काळ आरोग्याची सेवा उपलब्ध व्हावी, मिळावी, त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने त्र्यंबकेश्वर शहर-परिसरात चार महिन्यांसाठी ३१ ठिकाणी तात्पुरते तीन खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल, तसेच घटनास्थळीच तत्काळ प्रथमोपचार व स्थिर उपचार पुरवणे शक्य होणार आहे.
....
२०-२ चौकट
रुग्णालयांचे प्रमुख वैशिष्ट्ये :
- साधुग्रामवर विशेष लक्ष : साधू-संतांचा निवास असलेल्या साधुग्रामच्या सेक्टर १ ते ८ या आठही विभागांमध्ये स्वतंत्र केंद्रे कार्यरत राहतील.
- घाट व मंदिर परिसर सुरक्षितता : गर्दीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगण, पूर्व दरवाजा, कुशावर्त भाग १ व २, तसेच गोरक्षनाथ घाटावर आपत्कालीन प्रथमोपचार पथक २४ तास तैनात असेल.
- अद्ययावत रुग्णवाहिका जोडणी : या ३१ तात्पुरत्या केंद्रांना ''रिले सिस्टीम''द्वारे रुग्णवाहिका आणि मुख्य जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालयांशी जोडले जाईल. प्राथमिक उपचारानंतर गरज भासल्यास रुग्णाला त्वरित मोठ्या रुग्णालयात हलवणे सोपे होईल.
- अहोरात्र सेवा : औषधसाठा, ऑक्सिजन सिलिंडर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या शिफ्टमध्ये या सर्व ३१ केंद्रांवर सेवा अखंड सुरू ठेवली जाणार आहे.
-----------------
या ठिकाणी असणार
तात्पुरती रुग्णालये....
- एमटीडीसी ब्रह्मगिरी मार्ग
- धन्वंतरी कुटी दक्षिण
- निर्मल आखाडा
- बीएसएनएल कार्यालय
- अल्पबचत भवन
- नया उदासीन आखाडा
- पंचदशनाम आव्हान आखाडा
- बडा उदासीन आखाडा
- जुना आखाडा नील पर्वत
- गोरक्षनाथ घाट
- नवीन पोलिस स्टेशन
- पावन गणपती मंदिर
- मेळा बस स्टॉप
- स्वामी समर्थ केंद्र (गेट क्र. १)
- साधुग्राम - सेक्टर १
- निरंजनी आखाडा
- साधुग्राम - सेक्टर २
- महानिर्वाणी आखाडा
- साधुग्राम - सेक्टर ३
- कामेश्वर आश्रम
- साधुग्राम - सेक्टर ४
- रक्षकनगर पोलिस स्टेशन
- साधुग्राम - सेक्टर ५
- त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगण
- साधुग्राम - सेक्टर ६
- त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजा
- साधुग्राम - सेक्टर ७
- कुशावर्त भाग १
- साधुग्राम - सेक्टर ८
- कुशावर्त भाग २
- धन्वंतरी कुटी उत्तर
.........
कोट (NSK26H28259)
सिंहस्थ कुंभमेळादरम्यान लाखो भाविक दररोज त्र्यंबकेश्वरमध्ये असतील. येणार्या भाविकांना कोणतीही आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्यांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी, त्या अनुषंगाने सुक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही. त्यासाठी ३१ ठिकाणी तात्पुरते स्वरुपाचे रुग्णालय उभारले जाणार आहेत.
- डॉ. सतीश शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नाशिक.
....
कोट (NSK26H28263)
सिंहस्थाच्या चार महिन्याच्या कालावधीसाठी तीन खाटांचे ३१ रुग्णालये त्र्यंबक परिसरात उभारले जातील. या रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या अनुषंगाने सर्वसोयीसुविधा उपलब्ध असतील. २४x७ वैद्यकीय अधिकारी असतील. याठिकाणी रुग्णवाहिकाही उपलब्ध असतील.
- डॉ. अनंत पवार, नोडल अधिकारी, सिंहस्थ कुंभमेळा, जिल्हा रुग्णालय, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.