नाशिक

वंदना तोरवणे यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर

CD
28387 वंदना तोरवणे ------------------------------ वंदना तोरवणे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर अनाथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ३१ : पालकांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुलामुलींना शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच आदिवासी दुर्गम भागातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या तळोदा येथील वंदना रामदास तोरवणे यांना राज्य शासनाचा २०२२-२३ चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. महिला व बालविकास विभागातर्फे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वंदना तोरवणे यांनी तळोदा येथील दावलशा बाबा संचलित निवासी शाळेत अनाथ मुला-मुलींना प्रवेश मिळवून दिला. शिक्षण, संस्कार आणि सुरक्षित वातावरणाच्या माध्यमातून या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनाथ आणि वंचित विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला. उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे पाठवून त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता आले असून, विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा व शहादा परिसरातील आदिवासी दुर्गम पाडे आणि गावांमध्ये त्यांनी महिलांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने काम केले. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि संबंधित पातळीवर पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. वंदना तोरवणे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. या माध्यमातूनही त्यांनी नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या विविध प्रश्नांवर काम केले. दुर्गम, आदिवासी भागातील महिला, अनाथ आणि वंचित मुला-मुलींसाठी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत तोरवणे यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड केली आहे. शासनाने जिल्हास्तरीय आणि विभागीय पुरस्कार अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरविले आहे. आता राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला याचा आनंद आहे. सामाजिक कार्य हा माझा श्‍वास आहे आणि या श्‍वासाला पुरस्काराने अधिक बळ दिले आहे. ज्या अनाथ मुलांच्या सेवेमुळे हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे, त्या अनाथांच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी यापुढेही माझा प्रवास सुरूच ठेवेल. वंदना तोरवणे, अध्यक्षा, दावलशा बाबा संचलित निवासी शाळा, तळोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT