नाशिक

स्वाध्याय परिवारातर्फे पथनाट्यातून जागर

CD
स्वाध्याय परिवारातर्फे पथनाट्यातून जनजागृती नाशिक : श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्ताने स्वाध्याय परिवारातील युवा वर्गातर्फे ठिकठिकाणी ६ सप्टेंबरपर्यंत पथनाट्यातून जनजागृती करण्यात येणार आहे. ‘हमने है माखन पाया’ या संकल्पनेवर आधारित पथनाट्य सादरीकरण केले जाईल. स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून आणि परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पथनाट्यातून समाजात विविध विषयांवर जागर करण्यात येतो. यंदाच्या वर्षीही देशभरातील १५ राज्य तसेच अमेरीका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह १५ देशांमध्ये १७ हजार युवकांच्या पथकांमार्फत हे पथनाट्य सादर केले जाईल. त्यामध्ये साधारणत: दोन लाख युवक सहभागी होतील, अशी माहिती स्वाध्याय परिवारातर्फे देण्यात आली. ------ वारकरी संप्रदाय जिल्हाध्यक्षपदी कापसे नाशिक : वारकरी संप्रदायाच्या जिल्हाध्यक्षपदी निवृत्ती महाराज कापसे गणेशगावकर यांची निवड करण्यात आली आहे. वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अण्णासाहेब महाराज आहेर आणि सचिव पुंडलिक थेटे यांनी कापसे यांच्या निवड जाहीर केली. कापसे महाराज यांच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भरत महाराज वाघ, श्याम गायकर, दिनकर खांडबहाले, पांडुरंग गडकरी, सतीश आलय, संजय गोडसे यांच्यासह सर्व वारकरी मंडळींनी अभिनंदन केले आहे. फोटो क्रमांक : एच-28345

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या भेटीदरम्यान आम्ही खलाशांचा मुद्दा उपस्थित केला

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT