टुडे १, फ्लायर
----
‘एसआयआर’ मोहिमेचा भाजप माजी आमदारांना फटका
उपशीर्षक
धक्कादायक प्रकार; मतदारयादीतून सर्व कुटुंबीयांची नावे गायब
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : प्रशासनाकडून नुकत्याच राबविण्यात आलेल्या ‘एसआयआर’ मोहिमेतील घोळाबाबत अनेक तक्रारी समोर येत असताना आता जळगावातील भाजपच्या माजी आमदारासह त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून संबंधित माजी आमदाराने त्याबाबत हरकतही नोंदवली आहे.
देशभरातच मतदारयाद्यांच्या विशेष पुनरीक्षणाचा (एसआयआर) कार्यक्रम गेल्या काही महिन्यांत हाती घेण्यात आला. त्यानुसार जळगाव जिल्हा प्रशासनाने ही मोहीम नुकतीच राबवली. जळगाव शहरात विविध भागात, प्रभागनिहाय बीएलओंमार्फत ‘एसआयआर’ प्रक्रिया पार पाडण्यात आली. ही प्रक्रिया राबवित असताना अनेक ठिकाणी घोळ झाल्याचे दिसून येत आहे.
माजी आमदाराचे नाव गायब
या मोहिमेदरम्यान आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे मतदारयादीतून गायब झाली आहेत. स्वत: चंदुलाल पटेल, त्यांचे दोन्ही बंधू, वहिनी, मुलांचीही नावे यादीत आढळून आली नाहीत. श्री. पटेल यांचे निवासस्थान जयनगर परिसरात, महापालिकेतील प्रभाग क्रमांक १२ मध्ये आहे. त्यांनी याबाबत या क्षेत्रातील बीएलओंकडे तक्रार नोंदवली असून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले. नव्याने होणाऱ्या पुनरीक्षणात ही नावे समाविष्ट होतीलही; पण, अशाप्रकारे माजी आमदार व त्यांच्या कुंटुंबीयांचीच नावे गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होतेय.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.