नाशिक

कापूस मालिकाकापूस मालिका

CD
टुडे ४ ॲंकर शहर -जिल्ह कॉमन लोगो : नवतंत्राच्या साथीने कापसाची शेती (लोगो आजच्या टुडे ४ मधून घ्यावा) --------------------- शीर्षक कापसाचे उत्पादन वाढले तरच जीनिंगला उभारी उपशीर्षक एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन देणाऱ्या आधुनिक बियाण्यांची गरज सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शेतकऱ्यांना किमान १० ते १२ क्विंटल प्रतिएकर उत्पादन देणाऱ्या कापसाचे बियाणे उपलब्ध झाले तर जीनिंग व्यवसाय पुन्हा उभारी घेईल. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन वाढेल व खर्च कमी होईल. उत्पादन वाढीसाठी शासनाने ५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे सकारात्मक पाऊल असले तरी जगात बीजी ७ तंत्रज्ञान आले असताना आपण ‘बीजी २’ वर अडकून पडलो आहोत. आपण देशी वाणावर खर्च करीत आहोत. गुजरातमधील शेतकरी मान्यता नसलेले बीजी ४ बियाणे वापरून गुणवत्तापूर्ण व अधिक उत्पादन घेत आहेत. खानदेशात सुद्धा अनेक शेतकरी ते बियाणे वापरून भरपूर उत्पादन घेतात. अशा आधुनिक बियाण्याला मान्यता देऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर जीनिंग व्यवसाय सुद्धा प्रगती करेल व त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होईल. ‘जीनिंग’ अडचणीत एकरी उत्पादन ३ ते ४ क्विंटल इतके कमी झाल्याने जिल्ह्यातील १५० पैकी ५० देखील जिनिंग व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालविता येत नाहीत. २५ लाख गाठी तयार करण्याची क्षमता कारखान्यांची आहे. मात्र पुरेसा कापूस मिळत नसल्याने फक्त ८ लाख गाठी तयार होतात, असे खानदेश जीनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले. उत्पादन वाढीचे असे आहेत उपाय माती परीक्षण : माती परीक्षण केल्याने कोणती व किती प्रमाणात खते द्यावीत याचे ज्ञान होऊन खते योग्य मात्रेत देता येतील. संतुलित खत व्यवस्थापन : नत्र. स्फूरद, पालाश बरोबर सल्फर, झिंक, बोरॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करून उत्पादन वाढू शकते. ठिबक सिंचन : फक्त पाण्याची बचतच नाही तर कायम वाफसा स्थिती राहून पीक जोमदार राहण्यासाठी ठिबक सिंचन उपयोगी आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापन : फेरोमन ट्रॅप, पिवळे चिकट सापळे, जैविक कीट नियंत्रण व योग्य वेळी फवारणी केल्याने पीक निरोगी राहते. योग्य वेचणी : स्वच्छ कापसाला बाजारात जास्त भाव मिळतो. त्यासाठी वेळेवर वेचणी व स्वच्छ कापूस वेचणी महत्वाची ठरते. चौकट नव्या तंत्रज्ञानाचा वापर दोन ओळीत व दोन झाडातील अंतर कमी करून झाडांची संख्या वाढवून उत्पादन वाढीकडे शेतकरी वळत आहेत. अनेक शेतकरी तरुण ड्रोन फवारणी व्यवसायात आले असून २०२५ च्या हंगामात सुमारे १ हजार एकर कापसाच्या क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT