टूडे साठी महत्वाचे
------------
स्वाईन फ्ल्यू, डेंगीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन ॲलर्ट मोडवर
टास्क फोर्सच्या माध्यमातून व्यापक मोहीम; आरोग्य विभागाची बैठक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : गेल्या वर्षाच्या तुलनेत डेंगी नियंत्रणात आला असला तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा भाग म्हणून महापालिकेने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सच्या माध्यमातून आजार नियंत्रणात आणण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात सरकारी कार्यालयांची तपासणीसह गणेशोत्सवात स्वाईन फ्ल्यूची लाट येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.
शहरातील विविध आजार व आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर जुने नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अचानक भेट देवून पाहणी केली. या वेळी आयुक्त खत्री म्हणाल्या, १० ते २५ ऑगस्टदरम्यान डेंगी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. एका पथकामध्ये आशावर्कर्स यासह चारशे जणांचा समावेश करण्यात आला. टास्क फोर्सच्या माध्यमातून एक लाख ७० हजार घरे तपासण्यात आली. एकूण साडेसहा लाख लोकांची तपासणी करण्यात आली. यात एक हजार ४२७ तापाचे रुग्ण आढळले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. जानेवारीपासून ते आतापर्यंत ९६ डेंगीचे रुग्ण आढळले. मागील वर्षी हीच संख्या १४० होती. या वर्षी ऑगस्टमध्ये ४० रुग्ण आढळले. पेस्ट कंट्रोल, औषध फवारणी, जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळाल. आता नव्याने दहा ते २० सप्टेंबर या कालावधीत जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. विशेष करून गणेशोत्सव मंडळांमध्ये जनजागृती होईल.
-----------------
सरकारी कार्यालये रडारवर
सरकारी कार्यालयांमध्ये थेट तपासणी करता येत नाही. परंतु डेंगी उत्पत्तीची ठिकाणे याच कार्यालयांमध्ये आढळतात. विशेष करून आयएसपी, सीएनपी प्रेस, जिल्हा परिषद इमारत या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे.
-------------------
महापालिका औषधे देणार
स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेला कळविणे बंधनकारक केले आहे. खासगी रुग्णालयात उपचारानंतर रुग्णांना आवश्यकता वाटल्यास महापालिकेच्या रुग्णालयांतून मोफत औषधे पुरविली जाणार आहे. आतापर्यंत स्वाईन फ्ल्युच्या ११९ केस आढळल्या. त्यात ऑगस्टमध्ये ९१ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने उपचाराची तयारी केली आहे.
------------------
महापालिकेच्या मोहिमेत
- आजारांवर नियंत्रणासाठी जनजागृती मोहीम
- कचरा उचलला न गेल्याने घंटागाडी ठेकेदारांना आठ लाखांचा दंड.
- तपोवनात गप्पी मासे पालन केंद्र स्थापन करणार
- डेंगी, मलेरियाचे ब्लॅक स्पॉट शोधून नष्ट करणार
- स्वाईन फ्ल्युच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालय संचालकांची बैठक
- स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर बिटको, हुसेन रुग्णालयात स्वतंत्र विशेष कक्ष
- नदीपात्रातील पानवेली हटविणार, हटविलेली पानवेली उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी
- मोठ्या सोसायटी व संस्थांवर कचरा विलगीकरण न केल्यास कारवाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.