नाशिक

शाडूच्या गणेशमूर्ती महा-कार्यशाळेला उदंड प्रतिसाद

CD
टुडे ३ ॲंकर ---- (एनआयईचा लोगो वापरावा) --- शाडूच्या गणेशमूर्ती महा-कार्यशाळेला उदंड प्रतिसाद ऐतिहासिक विक्रमाचा भाग होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता सकाळ वृत्तसेवा जळगाव : ‘सकाळ-एनआयई’ आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३ हजार विद्यार्थ्यांच्या भव्य शाडू माती गणेशमूर्ती महा-कार्यशाळेला शहर व परिसरातील शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ''द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स''मध्ये नोंदविल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक विक्रमाचा भाग होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. हा अनोखा उपक्रम रविवारी (ता. ६ ) सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत ला. ना. हायस्कूल, स्टेट बँकेसमोर, जळगाव येथे पार पडणार आहे. एकाच छताखाली तब्बल तीन हजार विद्यार्थी स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणार असून, हीच मूर्ती आगामी गणेशोत्सवात आपल्या घरी स्थापन करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गप्रेम निर्माण व्हावे, पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचावा आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी सोबत आणावयाचे साहित्य पाण्यासाठी मग, कॉटनचे कापड किंवा फडके, मातीकामासाठी लाकडी अथवा प्लास्टिकची साधने, खराब झालेले पेन-पेन्सिल, लहान पट्टी, ब्रश, जाड दोरा, झाडूच्या काड्या इत्यादी, तयार झालेली गणेशमूर्ती सुरक्षितपणे घरी नेण्यासाठी लाकडी पाट आजच आपली जागा निश्चित करा कार्यक्रमाचे नियोजन आणि मर्यादित जागा लक्षात घेता, इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित आपली नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नावनोंदणीसाठी संपर्क प्रकल्पप्रमुख : दिनेश थोरात : ९८५०६०३५९० ‘सकाळ-एनआयई’ समन्वयक : आशुतोष पाटील - ८६६९७११०४९ नवीन स्थळ : ला. ना. हायस्कूल, स्टेट बँकेसमोर, जळगाव रविवार, ६ सप्टेंबर सकाळी ८ ते ११ ३,००० विद्यार्थी- एक भव्य पर्यावरणपूरक विक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT