धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 28349
निजामपूर : हस्ती बँक शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.
--
मोफत नेत्रतपासणी शिबिरात १६५ रुग्णांची तपासणी
--
हस्ती बँकेच्या निजामपूर शाखेचा वर्धापन दिन ; आरोग्य शिबिरासह उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३१ : हस्ती बँकेंच्या निजामपूर शाखेचा ११ वा वर्धापन दिन विविध आरोग्य व समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या मेगा आरोग्य शिबिराला निजामपूर व परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला. यात झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिरात १६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमास निजामपूर शाखा समितीचे अध्यक्ष पंडित बदामे, उपाध्यक्ष नयनकुमार शाह, समिती सदस्य प्रा. डॉ. सुधाकर जाधव, डॉ. प्रकाश गवळे, भगवान धामणे, प्रशांत पाटील, विजय रेलन, शाखा व्यवस्थापक सचिन शाह, निजामपूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण बर्गे, महेश राणे, संदीप चिंचोले, लक्ष्मीकांत राणे, शुभम येवले, हरीश रेलन, प्रकाश पाटील, जगदीश महाले, धर्मराज चिंचोले, प्रा. डॉ. ए. जे. जयस्वाल, पत्रकार रघुवीर खारकर, अनिल राणे, हेमंत महाले आदी उपस्थित होते.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल जैन यांची समाजसेवेची परंपरा आणि कांतीलाल जैन यांची समाजाचे आपण काही देणे लागतो ही विचारधारा पुढे नेत अध्यक्ष कैलास जैन यांच्या मार्गदर्शनात हस्ती बँकेमार्फत सातत्याने सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबविले जातात. कार्यक्रमांतर्गत नंदुरबारस्थित कांता लक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन रेखा धामणे यांच्या हस्ते झाले. नेत्रतज्ज्ञ श्याम सूर्यवंशी यांनी निजामपूर व परिसरातील १६५ गरीब व गरजू रुग्णांची नेत्र तपासणी केली. पैकी ३७ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच, धुळेस्थित श्री नवजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे उद्घाटन सुशीला गवळे यांच्या हस्ते झाले. शिबिरात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जोपासना केली.
महिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत हाडांची ठिसूळता तपासणी शिबिराचे उद्घाटन शाखा समितीचे उपाध्यक्ष नयनकुमार शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात यश मुथा यांनी १६२ महिलांची हाडांची ठिसूळता तपासणी केली. बँकेचे कर्मचारी सचिन काकुस्ते, अश्विनी पाटील, रोशन पाटील, सुरेश पाटील, अमोल देवरे, पिग्मी एजंट चंद्रकांत वाणी, हंसा शाह यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.