नाशिक

रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा उघड

CD
NSK26H28359 जळगाव : अटकेतील संशयितांसह पोलिस पथकाने जप्त केलेला मुद्देमाल, गुन्हा उघडकीस आणणाऱ्या पथकासह पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आदी. रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा उघड ‘सीसीटीव्ही’सह तांत्रिक पुराव्यांनी चोरट्यांच्या हाती बेड्या सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : मेहरुण भागातील रामेश्वर कॉलनीत देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबीयांचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. एमआयडीसी पोलिसांत दाखल या गुन्ह्यात पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिकी विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी दोन दिवसांत गुन्ह्यातील संशयितांना अटक करून ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. रामेश्वर कॉलनी येथील रहिवासी संगीता घुगे या कुटुंबीयांसह गुरुवारी (२७ व २८ ) उज्जैन (मध्य प्रदेश) येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व सोन्याचे दागिने लंपास केले. कुटुंब घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मोर्चा हाती घेत तपासासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना रवाना केले. चौकट फुटेजसह तांत्रिक विश्लेषण निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पथकाने सीसीटीव्ही फुटेज संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचे चित्रण मिळवले. गुप्त माहितीच्या आधारे संशयित विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५) व जितेंद्र मुरलीधर दाभाडे (२७, दोघे रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २०८ ग्रॅम सोने, ज्यात गळ्यातील गंठन (१३१ ग्रॅम), पाटल्या, काळमणी पाटली, अंगठ्या, नथ, टॉप्स व इतर दागिने,चांदीचे जोडवे असा ऐवज चोरट्यांनी पथकाला काढून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT